शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

'झेंडा हरवला आहे' एकांकिकेद्वारे ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर देशभक्तीचे प्रबोधन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 1:15 PM

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर 'झेंडा हरवला आहे' एकांकिकेद्वारे देशभक्तीचे प्रबोधन करण्यात आले. 

ठळक मुद्दे'झेंडा हरवला आहे' एकांकिकेद्वारे अभिनय कट्ट्यावर देशभक्तीचे प्रबोधन परेश दळवी दिग्दर्शित 'जय जय महाराष्ट्र माझा' ह्याचे सादरीकरणबालकलाकारांनी घेतला सहभाग

ठाणे : 'झेंडा हरवला आहे' म्हणजे देशात अनेक रंगांच्या झेंड्यामध्ये तिरंग्याचा रंग कुठेतरी हरवत चालला आहे त्याचा शोध.कलाकार म्हणून समाजाचे आपण काही देणं लागतो अशाच विचाराने अभिनय कट्ट्यावर आजवर अनेक कलाकृतीतून समाजप्रबोधन करण्यात आले आहे.प्रजासत्ताकदिनाच्या निमित्त अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांच्या संकल्पनेतून अभिनय कट्ट्यावर परेश दळवी लिखीत आदित्य नाकती दिग्दर्शित 'झेंडा हरवला आहे' ही एकांकिका सादर करण्यात आली.

         भारत देशाचा इतिहास अभूतपूर्व आहे.अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचे त्यागाचे प्रतीक आहे आपण अनुभवत असलेलं स्वातंत्र्य.परकीय गुलामगिरीतून मुक्तता मिळवल्यानंतर आजही आपण अनेक झेंड्याच्या नेतृत्वाखाली विखुरलेल्या अवस्थेत कुठेतरी मानसिक गुलामगिरीत घुसमटत जगत आहोत आणि त्यामुळे आपण आपल्या तिरंग्याचे अस्तित्व विसरून गेलो आहोत. त्यातील रंग हे फक्त धार्मिक अर्थाने न घेता केशरी म्हणजे त्याग बलिदान पांढरा म्हणजे शांती,हिरवा म्हणजे समृद्धीचे प्रतीक आहेत आणि निळे अशोक चक्र हे २४ तास प्रगतीशील राहण्यास प्रेरणा देणारे आहे ह्याचा विसर पडून आपण जणू आंधळेपणाने वावरत आहोत.अशाच देशातील अनेक झेंड्यामागे आंधळेपणाने धावणाऱ्या एका कार्यकर्त्याची आणि एका माजी सैनिकाची गोष्ट म्हणजे 'झेंडा हरवला आहे'..बाहेरील आतंकवादापेक्षा दिशाहीन तरुणपिढी अनेक रंगामध्ये विभागला जाऊन दंगली मोर्चे  अशा अंतर्गत आतंकवादाला कारणीभूत ठरतोय त्यांना खऱ्या झेंड्याची तिरंग्याची ओळख करून देण्याचा एक प्रयत्न म्हणजे 'झेंडा हरवला आहे'.फक्त दोन दिवस देशभक्तीचा इव्हेंट करण्यापेक्षा रोज देशा साठी त्याग केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना सैनिकांना पोलिसांना आठवून मनात एक कृतज्ञतेचा एक दिवा मनात लावून तो जपावं हा संदेश म्हणजे 'झेंडा हरवला आहे' एकांकिका.सदर एकांकिका सहदेव साळकर,ओमकार मराठे,महेश झिरपे,अमोघ डाके ह्या कलाकारांनी सादरीकरण केले.सदर सादरीकरणाला प्रेक्षकांनी विशेष दाद दिली. यासोबत अभिनय कट्ट्याच्या कलाकारांनी कदिर शेख दिग्दर्शित  'ये मेरे वतन के लोगो' आणि 'ये वतन वतन' ह्या देशभक्तीपर सादरीकरणाने प्रेक्षकांच्या डोळ्यांची कड ओलावली. सदर सादरीकरणात आदित्य नाकती,परेश दळवी,राजन मयेकर,शनि जाधव,धनेश चव्हाण,वैभव पवार,आतिश जगताप,संज्योत बावीसकर,उत्तम ठाकुर,शुभम कदम,कुंदन भोसले,रोहित सुतार,महेश झिरपे,सहदेव कोळंबकर,वैभव चव्हाण,न्युतन लंके,विजया साळुंके आणि रोहिणी थोरात  ह्या कलाकारांनी सहभाग घेतला.

      तसेच, महाराष्ट्रातील विविधतेतील एकता ह्या संकल्पनेवर आधारित परेश दळवी दिग्दर्शित 'जय जय महाराष्ट्र माझा' ह्याचे सादरीकरण अभिनय कट्ट्याच्या बालसंस्कार वर्गाच्या बालकलाकारांनी केले. सदर सादरीकरणात श्रेयस साळुंखे, चिन्मय मौर्ये,अमोघ डाके,अर्णय वाघ,अद्वैत मापगावकर,अस्मि शिंदे,पूर्वा तटकरे,वैष्णवी चेऊलकर,प्रथम नाईक,रुचिता भालेराव ह्या बालकलाकारांनी सहभाग घेतला. सदर कट्टा क्रमांक ४१३ चे निवेदन राजन मयेकर ह्यांनी केले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई