शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
2
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
3
अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
4
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
5
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
6
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
7
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
8
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
9
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
10
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल
11
'बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका...', चिन्मय दास यांच्या अटकेनंतर भारताची तीव्र प्रतिक्रिया; बांगलादेश म्हणाला...
12
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
13
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
14
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
15
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
16
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
17
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
18
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
19
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
20
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"

डोंबिवलीचा कोपर दिशेकडील उड्डाणपूल २७ मे पासून वाहतुकीसाठी होणार बंद?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 7:50 PM

मध्य रेल्वेचे महापालिकेला पत्र * आयआयटीच्या स्ट्रक्चरल आॅडिटनुसार रेल्वेचा निर्णय

ठळक मुद्देआयआयटीच्या स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये त्या पूलाची डागडुजी होणे अत्यावश्यक असल्याचे रेल्वेने महापालिकेला सोमवारी लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.धोकादायक पूलावरून वाहतूक करतांना जर काही अपघात झाला तर मात्र त्याला जबाबदार कोण? असा सवाल करत वाहतूक करायची की नाही अशी भिती वाहनचालकांमध्ये निर्माण झाली आहे.

डोंबिवलीडोंबिवली शहराला पूर्व पश्चिम जोडणारा कोपर दिशेकडील उड्डाणपूलाला डागडुजीची नितांत आवश्यकता असल्याने तो वाहतूकीसाठी २७ मे पासून बंद करण्यात यावा असे पत्र मध्य रेल्वेने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला लिहिले आहे. त्यामुळे हा पूल बंद झाल्यास त्याची दुरुस्ति कधीपासून सुरु होणार? किती दिवसांपर्यंत ते चालणार? तसेच ती डागडुजी कोण करणार या संदर्भात महापालिका प्रशासनाला कोणतेही तपशील माहिती नसल्याने डोंबिवलीकरांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. आयआयटीच्या स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये त्या पूलाची डागडुजी होणे अत्यावश्यक असल्याचे रेल्वेने महापालिकेला सोमवारी लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.१३ मे रोजी आयआयटीच्या तज्ज्ञांनी या संदर्भात सुरक्षा विषयक अहवाल मध्य रेल्वे प्रशासनाला दिला होता. त्यानूसार रेल्वे प्रशानाने तातडीने हा निर्णय घेतला आहे. येथील जाणकारांच्या माहितीनूसार १९८० दशकामध्ये हा उड्डाणपूल बांधण्यात आला. तेव्हापासून साधारणपणे दोन वेळा त्याची डागडुजी करण्यात आली होती. वरच्या भागातून जेथून वाहने जातात तेथे डांबरीकरणाचा रस्ता आहे. त्याठिकाणी डांबरीकरणाचे थर साठल्याने ते कमी करून पूलावरचे वजन कमी करण्यात आले होते. तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्या काळात तो उपाय केला होता. त्यानंतर पूलाची संरक्षक भिंतींची डागडुजी, रेलींग आणि रंगरंगोटी अशी कामे करण्यात आली होती. मध्य रेल्वे प्रशासनानेही त्या पूलाचे लोखंड गंजू नये यासाठी काही वर्षांपूर्वी चंदेरी रंगकाम केले होते. पण फार मोठ्या प्रमाणावर गेल्या ३५ वर्षामध्ये काहीही काम हाती घेण्यात आलेले नाही. त्यामुळे आता ते काम करावे लागणार असल्याने वाहतूकीचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. पावसाळयाच्या तोंडावर हा निर्णय घेण्यात आला तर मात्र डोंबिवलीकरांचे प्रचंड हाल होणार असून लाखो नागरिकांमध्ये नाराजी पसरलेली आहे. तसेच धोकादायक पूलावरून वाहतूक करतांना जर काही अपघात झाला तर मात्र त्याला जबाबदार कोण? असा सवाल करत वाहतूक करायची की नाही अशी भिती वाहनचालकांमध्ये निर्माण झाली आहे. आधीच कल्याणचा पत्रीपूलाचे काम कूर्मगतीने होत असल्याने त्यात आता हा पूल काही दिवसांसाठी का होईना बंद होणार असेल तर नागरिकांनी वाहतूक कोंडीमध्येच लटकायचे का? अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू असून नाराजी व्यक्त होत आहे.मध्य रेल्वेच्या पत्रासंदर्भात पुढे काय भूमिका घेणार यासंदर्भात महापालिकेचे आयुक्त गोविंद बोडके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मी निवडणूक कामानिमित्ति आॅब्झरव्हर असल्याने विजयवाडा येथे व्यस्त असून यासंदर्भात नगररचना विभागातील वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा करावी असे त्यांनी सांगितले. त्यानूसार नगररचनाकार सपना कोळी यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, डोंबिवलीच्या उड्डाणपूलासंदर्भात व्हाट्सअपवरच या संदर्भात पत्राची प्रत मिळाली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाशी यासंदर्भात बुधवारी पत्र पाठवणार आहे. त्यानूसार पूलामध्ये कोणते दोष आहेत? कुठे डागडुजी करावी लागणार आहे? ती रेल्वेने करायची की नाही? तसेच जोडरस्ते आहेत त्या ठिकाणी काही काम सुचवली असतील तर ती आमच्या माध्यमातून करायची का? त्या सगळयासाठी किती दिवसांचा अवधी लागणार आहे? किती निधी लागणार ही सर्व माहिती मागवली जाणार आहे. तसेच आयआयटी ने दिलेला अहवाल देखिल माहितीसाठी मागवून तज्ज्ञांची मते घेतली जाणार असल्याचे सांगितले.यासंदर्भात वाहतूक नियंत्रण पोलीस निरिक्षक सतेज जाधव म्हणाले की, असे कोणतेही पत्र, सूचना आम्हाला आमच्या वरिष्ठांनी दिलेल्या नाहीत. तसेच महापालिकेनेही संपर्क साधलेला नाही. यासंदर्भात सोशल मीडियावर चर्चा सुरु असून तेवढीच माहिती मिळाली आहे. पण संबंधित यंत्रणांकडून ठोस सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे आताच त्यासंदर्भात काहीही भाष्य करता येणार नाही असे ते म्हणाले.

ठाकूर्ली उड्डाणपूलाचा पर्याय* जर हा पूल २७ मे पासून वाहतूकीसाठी बंद झाला तर पूर्व पश्चिम वाहनांना ये जा करण्यासाठी ठाकुर्ली येथील नव्या उड्डाणपूलाचा एकमेव पर्याय असेल.पण तो पूल टू लेन असून आधीच अरुंद आहे. त्यातच पूलाचे ठाकुर्ली रेल्वे स्थानकाच्या दिशेने काम सुरु आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेdombivaliडोंबिवली