डोंबिवली: कल्याण-डोंबिवली औद्योगिक वसाहतीमधील नागरीकांना नेहमीच कंपन्यांमधील भीषण स्फोट, आगीच्या घटना आणि प्रदूषणाचा त्रसाला समोरे जावे लागते. काल झालेल्या पावसामुळे डोंबिवली मिलापनगर सव्र्हीसरोडवर नाला पाण्याने तुडुंब भरून वाहत होता. मात्र नाल्यातील पाण्याला जो फेस आला होता. त्यावरुन हे पाणी प्रदूषित असल्याचा संशयाने नागरीक धास्तावले होते.
डोंबिवली औद्योगिक वसाहतीत राहणारे मुकुंद साबळे यांच्या निदर्शनास हा प्रकार काल दिसून आला. त्यांनी नाल्यातून फेसाळलेल्या पाण्याचे फोटो काढून सोशल मिडियावर टाकले. त्यामुळे नागरीकांना नाल्यातून प्रदूषित पाणी वाहत असल्याने नाल्याच्या पाण्याला फेस आला असल्याचा संशय आला. डोंबिवलीतील गुलाबी रस्ता, हिरवा पाऊस या घटना घडत असतात. या घटना घडलेल्या असल्याने फेसाळलेल्या नाल्यामुळे प्रदूषित पाणी नाल्यात सोडले असल्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ज्याठिकाणी हा नाला वाहतो. त्याठिकाणी बीपीसीएल कंपनीनेने पाइपलाईन टाकण्यासाठी रस्ता खोदला आहे.
तो गेल्या चार महिन्यापासून तसाच आहे. त्याठिकाणी रस्त्याला पडलेले खड्डे, खोदलेला रस्ता आणि शेजारच्या नाल्यातून वाहणारे प्रदूषित पाणी या सगळया प्रकाराला सव्र्हीस रोड लगत राहणारे नागरीक वैतागले आहेत. फेसाळलेल्या नाल्या प्रकरणी नागरीकांनी एमआयडीसीला तक्रार केली. त्यावर एमआयडीकडून अधिकारी उद्या येऊन पाहणी करणार असल्याचे सांगण्यात आल्याची माहिती जागरुक नागरीक राजू नलावडे यांनी दिली आहे. फेसाळलेल्या नाल्याची घटना नागरीकांनी प्रथमच अनुभवली आहे. त्यामुळे या प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळ, कल्याण डोंबिवली महापालिका आणि एमआयडीसीने नागरीकांच्या तक्रारीची दखल घ्यावी अशी मागणी नागरीकांकडून करण्यात येत आहे.
फेब्रुवारी महिन्यात प्रदूषित पाण्यामुळे रस्ता गुलाबी झाला होता. त्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेऊन पाहणी केली. तसेच प्रदूषण करणा:या कंपनी मालकांनी त्यांच्यात सुधारणा केल्या नाहीत. सुरक्षिततेचा उपाययोजना पाळल्या नाहीत तर कंपन्यांना टाळे ठोकू असे आदेश दिले होते. धोकादायक, अतिधोकादायक व नियम न पाळणा:या कंपन्याचा प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने सव्रेक्षण करण्यात आले होते. ३०२ कंपन्यांचे सव्रेक्षण करण्यात आले. मात्र पुढील सव्रेक्षण कोरोना संकटामुळे रखडलेले आहे.