ठाणे : येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानास लागून असलेल्या येऊरच्या जंगलात हातभट्टीची दारू पाडण्याच्या ठिकाणी येऊर वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाड टाकून संबंधीतास रंगे हात पकडे. त्यावर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वन कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला.येऊर जंगलाच्या नागला बंदर परिसरातील ससूनवघर येथील राखीव वन क्षेत्रातील ईदळीचा नाला येथे हात भट्टीची दारू गाळताना खोलांडे ता. वसई येथील कमलाकर माळी (४१) यास रंगे हात पकडले. त्यांच्याजवळून २० लिटर गावठी दारू ताब्यात घेत त्याच्या वन कायद्याखाली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येऊर परिक्षेत्र वन अधिकारी राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनानुसार परिमंडळ वनअधिकारी रमाकांत मोरे यांनी कारवाई केली. याशिवाय भट्टीच्या जागेवर आढळून आलेले दारूचे ड्रममधील कच्चा माल नष्ठ करीत दारू हस्तगत केली.या जंगलातील दाड झाडीत हा इसम गावठी दारूचा पोटला वाहतूक करताना आढळून आल्यासह संबंधीत जागेवर वन अधिका-यांनी अचानक धाड टाकून त्यास अटक करीत दारू गाळण्याची साहित्य जप्त केले. याशिवाय त्याच्यावर अवैधरित्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली अंतर्गत दारूभट्टी लावून वन्यजीवांचे अधिवास यास धोका पोहचविणे, जंगलामध्ये आग पेटवणे, तसेच राष्ट्रीय उद्यानात अधिसूचना क्षेत्रामध्ये रासायनिक पदार्थाचा वापर करून अवैधरित्या गावठी दारू तयार करण्याच्या कारणाखाली संबंधीत आदिवासी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. याविषयी अधिक तपास वन अधिकाºयांकडून केला जात आहे........
ठाणे येऊरच्या जंगलातील दारू भट्टीवर वनाधिकाऱ्यांची धाड, रंगे हात पकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 2:19 PM
येऊर जंगलाच्या नागला बंदर परिसरातील ससूनवघर येथील राखीव वन क्षेत्रातील ईदळीचा नाला येथे हात भट्टीची दारू गाळताना खोलांडे ता. वसई येथील कमलाकर माळी (४१) यास रंगे हात पकडले. त्यांच्याजवळून २० लिटर गावठी दारू ताब्यात घेत त्याच्या वन कायद्याखाली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येऊर परिक्षेत्र वन अधिकारी राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनानुसार परिमंडळ वनअधिकारी रमाकांत मोरे यांनी कारवाई केली
ठळक मुद्देवन्यजीवांचे अधिवास यास धोका पोहचविणे,जंगलामध्ये आग पेटवणेआदिवासी व्यक्तीवर गुन्हा दाखल