लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यातून पुण्याला जाणार्या विमला जिवराज जैन या ८० वर्षांच्या आजीबार्इंची रिक्षात विसरलेली बँग अवघ्या २४ तासांमध्ये नौपाडा पोलिसांनी शोधून काढली. मौल्यवान वस्तूंसह साडेआठ हजारांची रोकड असलेली ही बॅग वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या पथकाने मंगळवारी या वृद्धेच्या ठाण्यातील नातेवाईकांकडे सुपूर्द केली.कळवा भागात राहणार्या विमला या काही कामानिमित्त पुण्याला जाण्यासाठी ३ आॅक्टोबर २०२१ रोजी दुपारी १२ च्या सुमारास निघाल्या. कळवा ते वंदना सिनेमा समोरील बसस्थानकामध्ये त्या रिक्षाने आल्या. मात्र, धावपळीमध्ये कपडे, मौल्यवान वस्तू तसेच रोकड असलेली बॅग त्या रिक्षात विसरल्या. त्यांनी तातडीने नौपाडा पोलीस ठाण्यात तक्र ार दिली. त्यानंतर त्या पुण्याला निघून गेल्या. इकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला. रिक्षात बसल्याचे कळव्यातील ठिकाण ते वंदना बसस्थानक या दोन ठिकाणांसह अन्य भागातील सीसीटीव्ही फुटेज पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे, पोलीस हवालदार साहेबराव पाटील, पोलीस नाईक संजय चव्हाण, सुनील राठोड आणि अंमलदार गोरख राठोड आदींनी पडताळले.पोलिसांचे मानले आभाररिक्षाचे शेवटचे क्र मांक सीसीटीव्हीमध्ये अस्पष्ट दिसत असल्यामुळे चार वेगवेगळ्या रिक्षांची माहिती मिळाली. अखेर यात हंसराज यादव (४०, रा. वागळे इस्टेट) या रिक्षाचालकाचे नाव निदर्शनास आले. ही बॅग त्याच्याकडेच असल्याची खात्री झाल्यानंतर त्याला सोमवारी सायंकाळी नौपाडा पोलीस ठाण्यात बोलावून विमला यांच्या नातेवाईक रेखा जैन आणि िमुकेश जैन यांच्याकडे बॅग आणि साडेआठ हजारांची रोकड सुपूर्द केली. विमला तसेच त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांचे आभार मानले. बॅग रिक्षात राहिल्याचे आपल्या लक्षात आले नसल्याचे यादव यांनी पोलिसांना सांगितले.
रिक्षात विसरलेली बॅग २४ तासात आजीबार्इंना केली सुपूर्द
By जितेंद्र कालेकर | Published: October 05, 2021 11:58 PM
ठाण्यातून पुण्याला जाणार्या विमला जिवराज जैन या ८० वर्षांच्या आजीबार्इंची रिक्षात विसरलेली बँग अवघ्या २४ तासांमध्ये नौपाडा पोलिसांनी शोधून काढली.
ठळक मुद्देनौपाडा पोलिसांची कामिगरी मौल्यवान वस्तू, रोकड मिळाली परत