शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

रूप इकोफ्रेण्डली गणेशाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 3:39 AM

गणेशोत्सव जसजसा जवळ येत आहे, तसतसे बाप्पाच्या आगमनाचे वेध गणेशभक्तांना लागले आहे.

- पंकज रोडेकर,ठाणे- गणेशोत्सव जसजसा जवळ येत आहे, तसतसे बाप्पाच्या आगमनाचे वेध गणेशभक्तांना लागले आहे. घरोघरी जय्यत तयारी सुरू झाली आहे. बाजारपेठा विविध वस्तूंनी सजल्या आहेत. मूर्तींच्या कारखान्यांत मूर्तींच्या पसंतीसाठी भक्तांची गर्दी पाहायला मिळते. अशातच पर्यावरणप्रेमी ठाणेकरांना इकोफ्रेण्डली आणि सुंदर-सुबक मूर्तींचा पर्याय मिळावा, या उद्देशाने कलाभवन येथे गणेशमूर्तींचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.प्लास्टर आॅफ पॅरिसमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी इकोफ्रेण्डली बाप्पा या अनोख्या उपक्रमांतर्गत ठाण्यात एका संस्थेने पर्यावरणपूरक शाडूच्या मातीपासून बनवलेल्या मूर्ती प्रदर्शनात मांडल्या आहेत. एकदोन नव्हे तर तब्बल ५५ प्रकारच्या बाप्पाच्या सुमारे ४०० मूर्तींचे प्रदर्शन भरवले आहे.ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने मोरया फाउंडेशन या संस्थेने कलाभवन येथे प्रदर्शन भरवले आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, या उद्देशाने गेली तीन वर्षे अशाच प्रकारचे प्रदर्शन भरवले जात आहे. यंदा प्रदर्शनात आठ इंचांपासून तीन फुटांपर्यंत मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत. प्लास्टर आॅफ पॅरिसच्या एका दिवसाला ५० ते १०० मूर्ती साच्यांमधून काढल्या जातात. मात्र, शाडूच्या मूर्तींची जडणघडण करताना, दिवसाला १० ते २० मूर्तींचीच निर्मिती होते. मातीची मूर्ती असल्याने ती वजनदार असते. नैसर्गिक रंगांचा वापर करून मूर्ती रंगवली जाते. शाडूच्या मातीची कमी उंचीची मूर्ती घरच्याघरीही विसर्जित करता येते. ही माती विरघळण्यासाठी साधारणत: १२ ते १४ तास लागतात. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होऊ शकते, असे आयोजकांनी सांगितले.प्रदर्शनात विविध प्रकारच्या मूर्ती ठाणेकरांचे लक्ष वेधून घेत आहेत. या आकर्षक आणि उत्कृष्ट रंगसंगतीत रंगवलेल्या मूर्ती डायमंड लावून अधिक मनमोहक केल्या आहेत. वासिंद येथील संकल्प स्कूल आॅफ आर्ट्स या कला महाविद्यालयातील सहा विद्यार्थी मूर्तींना डायमंड लावण्याचे काम करत आहेत. बाप्पाचे दागिने, शेला, धोती, मुकुट याला डायमंड लावण्यावर भर दिला जातो. एका मूर्तीला डायमंड लावायला एक तास इतका वेळ जातो, तर एक ते दोन फुटांच्या मूर्तीला डायमंड लावायला एक दिवसाचाही अवधी लागतो. हे डायमंड अवघ्या तासाभरातच चिकटतात अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली.पर्यावरणपूरक सण साजरा करण्यात ठाणेकर कायम आघाडीवर असतात. गणेशोत्सवही पर्यावरणपूरक साजरा व्हावा, या उद्देशाने इकोफ्रे ण्डली बाप्पा उपक्रमांतर्गत बाप्पाच्या मूर्तींचे प्रदर्शन कलाभवन येथे भरवण्यात आले आहे. ठाणे महापालिकेच्या सहकार्याने मोरया फाउंडेशनने भरवलेल्या या प्रदर्शनात शाडूच्या मातीत घडवलेली बाप्पाची सुबक, सुंदर आणि मनमोहक मूर्ती ठाणेकरांना पाहता येत आहेत. तब्बल ५५ प्रकारच्या मूर्ती येथे मांडण्यात आल्या असून त्या डायमंड, डायमंडमाळांनी आणि मोती यांनी अधिक आकर्षक बनवल्या आहेत.>फेटेधारीबाप्पालापसंतीया प्रदर्शनात जवळपास ५५ प्रकारच्या मूर्ती मांडण्यात आल्या आहेत. सिद्धिविनायक, अष्टविनायक, लालबाग, शेंदूर तसेच शिवरकर आसनपद्धत असलेली मूर्ती इथे आहे. फेट्यांच्या प्रकारांत टिळकफेटा, मराठाफेटा, म्हैसुरीफेटा, पुणेरीफेटा, बाजीराव पगडी, पेशवाई असे प्रकार उपलब्ध आहेत. याशिवाय, संपूर्ण मोतीकलरचा वापर करून तयार केलेली मूर्ती आहे. यातील एक मूर्ती ही हळद, कुंकू आणि मुलतानी माती यांचा वापर करून रंगवली आहे. याच अनोख्या उपक्रमाची पाहणी करताना येथील मूर्ती खुद्द ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनाही आवडल्या. त्यांनीही आपल्या घरी शाडूच्या मातीची बाप्पाची मूर्ती बसवण्याचा निर्णय घेत इकोफ्रे ण्डली गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या मागणीनुसार जवळपास दीड फुटाचा उंदीरमामा शाडूच्या मातीने घडवला असल्याचे मोरया फाउंडेशनचे सत्यम शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ganeshotsavगणेशोत्सव