लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये सर्रास चाललेली गुटखा विक्री व पोलिसांची हप्तेबाजी वर टीकेची झोड उठू लागली आहे . त्यातच भाईंदर पश्चिमेस माजी नगरसेवकाने गुटखा विक्रेत्यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना घडली आहे .
गुटखा विक्रीची मोकळीक देण्या करीत १० हजारांचा हप्ता घेताना भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाण्याचा हवालदार अमित पाटील ह्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्या नंतर वरिष्ठ निरीक्षक मिलिंद देसाई यांची पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी तेथून उचलबांगडी केली . गुटखा विक्रेत्यांना छुट देण्यासाठी लाच घेतली जात असल्या प्रकरणी टीकेची झोड उठू लागली आहे .
त्यातच भाईंदर पश्चिमच्या मुर्धा पालिके शाळे जवळील दुकानात अशोककुमार कालीशंकर साहु (वय ३८ वर्ष) गल्ली नंबर २४, रेवाआगार, मुर्धागाव हा गुटखा विक्री केली जात असल्याचे माजी नगरसेवक रोहित सुवर्णा व त्यांचे सहकारी तुषार पुजारी यांनी पोलिसांना शुक्रवारी कळवले . साहू पळून जाऊ नये म्हणून सुवर्णाचे आणि पुजारी यांनी त्यांना पकडून ठेवले . भाईंदर पोलीस घटनास्थळी आल्यावर तपासणी केली असता त्याच्याकडे १९ हजार ७६० रुपये किमतीचा दोन गोणी गुटखा सापडला . पोलिसांनी साहू व गुटखा ताब्यात घेऊन भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"