लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राबोडीतील एका घराचा पत्रा तोडून चोरी करणार्या आकाश पटेल (१९, रा. कॅसल मिल, ठाणे) याच्यासह चौघांना नुकतीच अटक केल्याची माहिती राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी गुरु वारी दिली. त्यांच्याकडून मोबाईल आणि संगणकासह २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.ठाण्यातील के व्हिला गार्डनमागे असलेल्या एका घरात अज्ञात चोरट्यांनी १० नोव्हेंबर रोजी रात्री १०.३० ते ७ डिसेंबर रोजी रात्री १२.३०वाजण्याच्या सुमारास पत्रा उचकटून घरातील सामानाची चोरी केली होती. यामध्ये संगणक, जुने गिटार वाद्य, काही भांडी आणि मोबाईल असा २२ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरीस गेला होता. याबाबतची तक्र ार १८ डिसेंबर रोजी दाखल झाली होती. यातील संशियत चोरटे राबोडी परिसरात फिरत असल्याची माहिती राबोडी पोलिसांना मिळाली. त्याआधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घाटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योगेश धोंगडे, पोलीस नाईक गिरीश पाटील, राजा पाटील आण िवाहिद तडवी आदींच्या पथकाने जावेद खान (३०, रा. राबोडी, ठाणे), सुलेमान अन्सारी (२१, रा. राबोडी) आण िअमीर शेख (३०, रा. राबोडी) या तिघांना १९ डिसेंबर रोजी, तर आकाश पटेल याला २१ डिसेंबर रोजी अटक केली. त्यांना २३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले होते. त्यांनी आणखी कुठे चोऱ्या केल्या आहेत का, याची चौकशी त्यांच्याकडून करण्यात येत असल्याचे राबोडी पोलिसांनी सांगितले.
घराचा पत्रा तोडून चोरी करणारी चौकडी जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 12:49 AM
राबोडीतील एका घराचा पत्रा तोडून चोरी करणार्या आकाश पटेल (१९, रा. कॅसल मिल, ठाणे) याच्यासह चौघांना नुकतीच अटक केल्याची माहिती राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी गुरु वारी दिली.
ठळक मुद्देराबोडी पोलिसांची कामिगरी२५ हजारांचा माल हस्तगत