लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : चार महिन्यांपूर्वी झालेल्या तानाजी जावीर (४८) याच्या खुनाचा शोध घेण्यात कासारवडवली पोलिसांना अखेर यश आले आहे. मालमत्तेच्या वादातून दोन लाखांमध्ये त्याच्या हत्येची सुपारी देणा-या कल्पना नागलकर (४५) हिच्यासह चौघांना बुधवारी अटक केली असून तानाजीच्या मृतदेहाचा अद्यापही शोध लागला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.तानाजी हे गेल्या १२ वर्षांपासून ठाण्यातील घोडबंदर रोडवरील नागला बंदर येथील कल्पना नागलकर हिच्याकडे कामाला होते. तिच्याकडेच वास्तव्यालाही होते. तो बेपत्ता असल्याची तक्र ार १७ जुलै २०२० रोजी कासारवडवली पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. पोलिसांना यात संशय आल्यामुळे पोलिसांनी तानाजीचे शेवटचे बोलणे झालेल्या संतोष घुगरे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तानाजीच्या बेपत्ता होण्यामागे तक्र ारदार कल्पना हिच्यावरही संशय होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने कल्पना हिला ताब्यात घेऊन तिच्याकडे उलटतपासणी केली असता, चौकशीत धक्कादायक बाब समोर आली.तानाजी हा कल्पनासोबतच वास्तव्याला होता. मात्र, मागील काही मिहन्यांपासून तिला तो त्रास देत होता. त्याने तिच्यासोबत काही आर्थिक व्यवहारही केले होते. या व्यवहारातून दोघांमध्ये सतत वाद होऊ लागल्यामुळे कल्पनाने त्याचा कायमचा काटा काढण्याचे ठरवले. यासाठी तिने घोडबंदर येथे राहणा-या गीता आरोळकर (४५) या मिहलेची मदत घेतली. तानाजीची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी गीताला दोन लाखांची सुपारी दिली होती. गीताने यासाठी आपला भाचा संतोष घुगरे याला त्यातील काही पैसे देऊन तानाजीच्या हत्येसाठी तयार केले. दरम्यान, संतोषने मंगेश मुरूडकर (३०) याची मदत घेऊन १७ जुलै रोजी दारूतून विष देऊन तानाजीची हत्या केली. नंतर, त्याचा मृतदेह नागला बंदर येथील खाडीत फेकून दिल्याची कबुली कल्पना हिने पोलिसांना दिली. याप्रकरणी बुधवारी चौघांना अटक केली असून तानाजीचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मालमत्तेच्या वादातून खुनाची सुपारी देणाऱ्या महिलेसह चौघांना अटक
By जितेंद्र कालेकर | Published: November 26, 2020 12:30 AM
चार महिन्यांपूर्वी झालेल्या तानाजी जावीर (४८) याच्या खुनाचा शोध घेण्यात कासारवडवली पोलिसांना अखेर यश आले आहे. मालमत्तेच्या वादातून दोन लाखांमध्ये त्याच्या हत्येची सुपारी देणा-या कल्पना नागलकर (४५) हिच्यासह चौघांना बुधवारी अटक केली आहे.
ठळक मुद्देकासारवडवली पोलिसांची कामिगरीचार महिन्यांपूर्वीच्या खुनाचा छडा