लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जुन्या वादातून महेंद्र दुनघव (२१, रा. माजीवडा, ठाणे) याच्यावर चाकूने खूनी हल्ला करणाऱ्या दिनेश अहिरे, बाळकृष्ण साटम, दीपक अहिरे आणि अक्षय दोंडके या चौघांना कापूरबावडी पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. त्यांना १४ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.माजीवडा, साईनाथनगर भागातील रहिवाशी दिनेशसह त्याच्या इतर तीन साथीदारांनी संगनमत करून महेंद्र याला विनाकारण पूर्ववैमनस्यातून ५ जुलै २०२१ रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास वाद घातला. यातूनच शिवीगाळ करीत त्याला मारहाणही केली. दीपक, अक्षय आणि बाळकृष्ण या तिघांनी त्याचे हातपाय पकडले. तर दिनेशने महेंद्रच्या छातीवर चाकूने खूनी हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महेंद्रला सायन येथील लोकमान्य टिळकरु ग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान, हल्ल्यानंतर चौघेही पसार झाले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख, संजय पाटील आणि निरीक्षक संजय निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड यांच्या पथकाने दिनेश याच्यासह चौघांनाही कापूरबावडी भागातून शनिवारी अटक केली. त्यांच्याकडून चाकूही हस्तगत केल्याचे पोलिसांनी सांगितले.
जुन्या वादातून तरु णावर खुनीहल्ला करणारे चौघे जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 11:47 PM
जुन्या वादातून महेंद्र दुनघव (२१, रा. माजीवडा, ठाणे) याच्यावर चाकूने खूनी हल्ला करणाऱ्या दिनेश अहिरे, बाळकृष्ण साटम, दीपक अहिरे आणि अक्षय दोंडके या चौघांना कापूरबावडी पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे.
ठळक मुद्देकापूरबारवडी पोलिसांची कामगिरीचाकू हस्तगत