पंकज पाटील /उल्हासनगर उल्हासनगर महापालिका निवडणुकीत पॅनल पद्धतीने निवडणूक होणार असल्याने या निवडणुकीत अनेक उमेदवारांनी स्वत:सह आपल्या पत्नीलादेखील उमेदवारी दिली होती. मात्र, निवडणूक निकालानंतर केवळ चार जोडपीच विजय मिळवण्यात यशस्वी झाली आहेत. उल्हासनगर महापालिकेतील पतीपत्नीच्या जोड्यांचा इतिहास यंदाही कायम राहिला असून यंदा पतीपत्नीच्या चार जोड्या यंदा सभागृहात दिसणार आहेत. यात सर्वाधिक तीन जोड्या शिवसेना पक्षातून असून प्रभाग क्र. ७ मधून रिपाइंचे भगवान भालेराव आणि पत्नी अपेक्षा भालेराव ही जोडीही सभागृहात गेली आहे. शिवसेनेच्या प्रभाग क्र. ३ मधील राजेंद्र भुल्लर आणि चरणजित कौर भुल्लर या विजयी झाल्या आहेत. प्रभाग क्र. १० मधून राजेंद्र चौधरी आणि राजश्री चौधरी ही जोडी आणि प्रभाग क्र . १५ मधून धनंजय बोडारे आणि वसुधा बोडारे यांचीही जोडी सभागृहात पाहायला मिळणार आहे. यंदाच्या निवडणुकीत साई पक्षाचे जीवन इदनानी आणि माजी महापौर आशा इदनानी हेही निवडणूक रिंगणात होते. मात्र, प्रभाग क्र मांक ९ मधून आशा इदनानी यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्याच वेळी प्रभाग ११ मधून जीवन इदनानी विजयी झाले आहेत. गेल्या वेळेस सभागृहात पोहोचलेल्या या जोडीतील केवळ जीवन इदनानी हेच सभागृहात दिसणार आहेत.
उल्हासनगर पालिकेत बसणार चार जोडपी
By admin | Published: February 24, 2017 7:05 AM