मीरा रोड : काशीमीरा पोलिसांनी मांडवीपाडा भागातून तीन अल्पवयीन बालकांना ताब्यात घेतले असून त्यांनी चोरीचे चार गुन्हे केल्याचे कबूल केले आहे. त्यांच्याकडून चोरीचा एक लाख ११ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
सहायक पोलीस आयुक्त विलास सानप, काशीमीराचे वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे, निरीक्षक जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र भामरे, उपनिरीक्षक धनंजय गायकवाड यांच्यासह जरग, शिंदे, मोरे, तायडे, मोहिले, यादव, तेरवे, सूर्यवंशी, पाटील, जाधव, खोत, बडे यांच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तीन अल्पवयीन बालकांवर पाळत ठेवून त्यांना ताब्यात घेतले.
त्यांच्या चौकशीत पोलिसांना काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीतील तीन तर नवघर पोलीस ठाणे हद्दीतील एका गुन्ह्याची उकल झाली. या बालकांनी एक रिक्षा, दोन दुचाकींसह स्लायडिंग, वायरिंग सामान, स्टील पाइप व भंगार सामानाची चोरी केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.
.........
वाचली