राजू काळे , भार्इंदरजिल्हा लघु पाटबंधारे विभागाच्या निर्देशाने स्टेम व एमआयडीसीने लागू केलेली ३० टक्के कपात अखेर दिवाळीच्या काळापुरती रद्द केल्याने चार दिवसांकरीता का होईना मीरा-भार्इंदरकरांसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर व वसई-विरारकरांची ‘पाण्याची दिवाळी’ साजरी होणार आहे. मात्र असे असले तरी त्यानंतरची कपात मात्र सुरुच राहणार असल्याचे संकेत लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अधिक्षक एस. जे. निकर्डे यांनी दिले . स्टेमकडून ठाण्यासह मीरा-भार्इंदर व भिवंडी-निजामपूर महापालिकांसह जिल्हा परिषदेंतर्गत ३४ गावांना तर एमआयडीसीकडून ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर व वसई-विरार महापालिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. तो प्रामुख्याने बारवी, मोरबे आंध्रा धरणातून उल्हासनदीत होणाऱ्या पाण्याच्या विसर्गातून केला जातोे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने धरणातील जलसाठा सुमारे ७० टक्के इतका शिल्लक आहे. त्यामुळे तत्कालिन जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कपातीचे संकेत जिल्हा लघु पाटबंधारे विभागाने दिले होते. त्यानुसार ४ नोव्हेंबरपासून शटडाऊनच्या माध्यमातून पाणी कपातीला सुरुवात झाल्याने पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होऊन अनेक भागांत तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. या दोन्ही यंत्रणांपैकी स्टेमचा शटडाऊन प्रत्येक आठवड्याच्या बुधवार ते गुरुवार दरम्यान २४ तासांकरीता तर एमआयडीसीचा शटडाऊन बुधवार ते शुक्रवार दरम्यान ४८ तासांकरीता घेण्यात येत आहे. त्यामुळे नागरीकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.27तासांची ही पाणीकपात ऐन दिवाळी सणात सुरु झाल्याने उद्भवलेल्या पाणीटंचाईमुळे नागरीकांच्या तोंडचे पाणीच पळाले होते. ती रद्द होण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक, आमदार मुझफ्फर हुसेन, आमदार नरेंद्र मेहता आणि माजी खासदार संजीव नाईक यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. रस्त्यावर गळती सुरूचनेवाळी : यावर्षी कमी पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळाचे सावट पसरले असताना राज्यात मुंबईसह कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेने दोन दिवस पाणीकपात सुरू केल्याने परिसरातील नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले असून असंतोष निर्माण झाला आहे. लागोपाठ दोन दिवस पाणी नसल्याने अंघोळ, धुणीभांडी सोडाच काही ना प्यायलाही पाणी मिळत नाही. तर दुसरीकडे कल्याण श्रीमलंग रोडवरील रिलॅक्स गार्डन नांदिवली बस थांबा परिसरात पाणीगळती सुरूच असून संपूर्ण रस्ता खड्डे व चिखलमय बनल्याने वाहनचालक व नागरिकांना चालताना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे.
चार दिवसांची दिवाळी
By admin | Published: November 11, 2015 12:16 AM