अंबरनाथ : येथील गायकवाडपाडा परिसरात बारशाच्या कार्यक्रमात झालेल्या गोळीबारात १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. या प्रकरणातील चौघाही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता त्यांना ६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, आरोपींकडे रिव्हॉल्व्हर कुठून आले, याचा पोलीस शोध घेत आहेत. गायकवाडपाडा येथे मंगळवारी रात्री २ वाजता बारशाच्या कार्यक्रमात हवेत गोळीबार करत बंदुकीतून सुटलेली गोळी त्या ठिकाणी प्रतीक गायकवाड या १२ वर्षांच्या मुलाला लागली. या प्रकरणानंतर सर्व आरोपी फरार झाले होते. भास्कर गायकवाड यांच्या फिर्यादीवरून आदेश गायकवाड, आशीष गायकवाड, सत्यजित गायकवाड आणि कबीर गायकवाड या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)सीसीटीव्ही फूटेज केले नष्ट पोलिसांनी घटनास्थळी आणि अन्य नागरिकांकडून माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, कार्यक्रमाला सर्व नातेवाईक मंडळीच असल्याने पोलिसांना योग्य माहिती मिळण्यास विलंब लागत आहे. तसेच त्या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही फुटेज नष्ट केल्याने तपासात अडचणी येत आहेत.
गोळीबार प्रकरणी चौघांना कोठडी
By admin | Published: February 03, 2017 2:05 AM