शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

घोडबंदरवासीयांकडून चार पट कर आकारणी

By admin | Published: April 19, 2017 12:30 AM

ठाणे महापालिकेने या पुढे भांडवली मुल्यावर आधारीत कर आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, त्या आधीच नव्या धोरणानुसार म्हणजेच रेटेबल व्हॅल्युनुसार घोडबंदर

ठाणे : ठाणे महापालिकेने या पुढे भांडवली मुल्यावर आधारीत कर आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, त्या आधीच नव्या धोरणानुसार म्हणजेच रेटेबल व्हॅल्युनुसार घोडबंदर भागातील अनेक सोसायट्याना आलेला मालमत्ताकर हा अव्वाच्यासव्वा असल्याने तेथील रहिवासी हैराण झाले आहेत. घोडबंदरचा रेटेबल व्हल्यू मुल्य हे ठाण्यातील इतर ठिकाणांच्या दृष्टीने अधिक असल्याने येथील सदनिकाधारकांना हा टॅक्स आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. परंतु,यापुढे जर भांडवली मुल्यावर आधारीत कर वसुली झाली तर यामध्ये आणखी वाढ होणे अपेक्षित असल्याचेही पालिकेने म्हटले आहे. भांडवली मुल्यावर आधारीत प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर २०१८- २०१९ या आर्थिक वर्षापासून त्यानुसार कर आकारणी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. परंतु, ही प्रणाली लागू होण्यापूर्वीच रेटेबल व्हॅल्यूनुसार घोडबंदर भागातील अनेक नव्या सदनिकाधारकांना तब्बल चारपट अधिक मालमत्ताकर आला आहे. त्यामुळे ही कर आकारणी नेमकी कोणत्या पद्धतीने झाली, कोणत्या तत्वावर झाली यासाठी रहिवासी पालिकेच्या खेटा घालत आहेत. यंदाचा अर्थसंकल्प मांडला जात असताना त्या अर्थसंकल्पातच २०१७ - २०१८ या वर्षापासून निवासी मालमत्तेच्या जललाभ करमध्ये १२ टक्के ऐवजी २२ टक्के,निवासी मालमत्तेच्या मलनि:सारण लाभकर ९ टक्क्यावरून १९ टक्के, निवासी मालमत्तांच्या करात ५ टक्के ऐवजी १५ टक्के वाढ, निवासी मालमत्तांच्या रस्ता करात १० टक्के वाढ सुचवली आहे. यामुळे मालमत्ताकरापासून ४८० कोटी रु पये जमा होऊ शकतील, असा दावा आहे. याबाबत ज्या रहिवाशांना अशी चारपट बिले आली आहेत. त्यांनी पालिकेकडे विचारणा केली असता २०१६ नंतर ज्यांनी वापर परवाना घेतला आहे त्यांना ही वाढीव बिले दिली असल्याचे सांगितले.फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेने ५०० चौरस फुटापर्यंत मालमत्ताकर माफ करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. हा निर्णय कधी मंजूर होणार याकडे आता ठाणेकरांचे लक्ष लागले आहे. अन्यथा हा वाढीव कर लादल्यास ठाण्यात उग्र आंदोलन पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. या वर्षीचा पालिकेचा अर्थसंकल्प ३ हजार ३९० कोटी ७८ लाख रु पयांचा असून महसुली उत्पन्न २ हजार २३३ कोटींचे अपेक्षित धरले आहे. यामध्ये मालमत्ताकरापासून ४८० कोटी उत्पन्न मिळणार आहे. यंदा पुन्हा पालिकेने मालमत्ताकरात समाविष्ट असलेल्या विविध लाभ करात वाढ सुचविली आहे. (प्रतिनिधी)