शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
3
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
4
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
5
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
6
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल
7
"असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील", मोदींचा काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा
8
देशातील गरिबांना 2028 पर्यंत मोफत धान्य मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
9
हरयाणातील निवडणुकीच्या निकालावर रॉबर्ट वाड्रांची प्रतिक्रिया, ईव्हीएम बॅटरीच्या मुद्द्यावर म्हणाले...
10
मनोज जरांगेंशी पंगा घेणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजपाकडून निवडणूक लढण्याची केली घोषणा
11
"जितना हिंदू बंटेगा, उतना...", असं का बोलले पंतप्रधान मोदी? महाराष्ट्रातील जनतेला केलं मोठं आवाहन
12
'असरदार' सरदार! अर्शदीपची Top 10मध्ये एन्ट्री; हार्दिक पांड्याही दुसऱ्या यादीत Top 3 मध्ये!
13
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
14
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
15
हरयाणात निकालांनंतर भाजपाचं अर्धशतक पूर्ण, दोन अपक्ष आमदारांनी दिला पाठिंबा
16
Trent shares: TATA च्या 'या' शेअरनं रचला इतिहास, २ दिवसांपासून मोठी खरेदी; एक्सपर्ट बुलिश
17
फायद्याची बातमी! २०० रुपये वाचवून गुंतवणूक करा, मॅच्युरिटीवर २८ लाख मिळतील; LIC ची जबरदस्त योजना
18
गुणरत्न सदावर्तेंनी 'बिग बॉस'चे नियम बसवले धाब्यावर, आधी ढाराढूर झोपले आता घातला गोंधळ!
19
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
20
वाढदिवस ठरला शेवटचा! केक, पापड आणि...; ५ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूमागचं सत्य काय?

कुटुंबातील चार जणांचा आगीत होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 7:24 AM

मोखाडा तालुक्यातील ब्राह्मणपाडा येथील अनंता बाळू मौळे यांच्या दुकान व घराला रविवारी मध्यरात्री २.३० वाजता शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

 मोखाडा : तालुक्यातील ब्राह्मणपाडा येथील अनंता बाळू मौळे यांच्या दुकान व घराला रविवारी मध्यरात्री २.३० वाजता शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.आग इतकी भयानक होती की, काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. यात दुकानातील संपूर्ण माल जळून खाक झाला तर घरातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. दोन जण भाजल्यामुळे त्यांना नाशिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.ब्राह्मणपाडा स्टॉप येथील अनंता बाळू मौळे यांच्या घराला लागूनच होलसेल किराणा मालाचे दुकान होते. त्यात मध्यरात्री २.३०च्या दरम्यान अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले. यात घरात अनंताची चार मुले, आई व पत्नी असे सात जणांचे कुटुंब राहत होते. आगीत झोपलेल्या वृद्ध आई गंगुबाई मौळे, पत्नी द्वारका मौळे, मुलगी पल्लवी मौळे (१५), तर मुलगा कृष्णा मौळे (१०) या चौघांचा झोपेतच होरपळून मृत्यू झाला. मुलगा भावेश मौळे (१२) व मुलगी अश्विनी मौळे (१७) हे दोघे भाजले असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे. अनंता मौळे यांना डोक्याला दुखापत झाल्यामुळे त्यांना मोखाडा येथील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :fireआग