ठाणे : सुमारे वीस लाख रूपये किंमत असलेली बिबट्याची कातडी विकण्यासाठी आलेल्या चौघाना येऊर जंगलाच्या प्रवेशव्दारावर वन अधिका-यांनी साफळा रचून बुधवारी रात्री अटक केली. वन कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.वनाधिका-यांनी हस्तगत केलेली बिबट्याची कातडी तळा रोहा येथून आणल्याची कबुली अटक केलेल्या आरोपींनी दिल्याचे येऊर जंगल परिक्षेत्र वन अधिकारी राजेंद्र पवार यांनी सांगितले.अंदाजे वीस लाख रूपये किंमत असलेली बिबट्याची कातडी विकण्यासाठी चौघे वाहनाव्दारे येथील येऊन जंगलाच्या प्रवेशव्दारावर आले होते. पण गोपनीय माहितीच्या आधारे आधीच साफळा रचून ठेवलेल्या वनाधिका-यांनी वाहनासह आरोपी बशीर पठण , जावीद पठाण हे दोन्ही तळा, रायगड येथील रहिवाशी आहेत. तर किरण राऊत (रा. निवी), मधुकर कंक (भुवनेश्वर) हे दोन्ही रोहा तालुक्यातील आहेत. या चौघा आरोपींच्या वाहनातून बिब्याची कातडी वनाधिका-यांनी शिताफीने हस्तगत करून त्यांना रंगे हात पकडले.अंदाजे वीस लाख रूपये किंमत असलेल्या या बिबट्याचे कातडे तळा ता. रोहा येथून आणल्याचे आरोपींकडून सांगण्यात आले. या आरोपींकडून अन्यही माहिती मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन वन अधिका-यांकडून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. या गुन्ह्यातील अधिक तपास बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक व संचालक अनवर अहमद यांच्याकडून केला जात आहे. या तपासात येऊर जंगल परिक्षेत्र वन अधिकारी राजेंद्र पवार यांच्यासह परिमंडळ वन अधिकरी सुजय कोळी, विकास कदम, संजय साबळे, अमित राणे, जितेंद्र देशमुख, रमाकांत मोरे, शेखर मोरे सुशिल रॉय भगवान भगत आदी वनरक्षकांचा समावेश आहे.............
बिबट्याची कातडी विकणाऱ्यां चौघांना ठाणेच्या येऊर वनाधिकाऱ्यांकडून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 5:56 PM
वनाधिका-यांनी हस्तगत केलेली बिबट्याची कातडी तळा रोहा येथून आणल्याची कबुली अटक केलेल्या आरोपींनी दिल्याचे येऊर जंगल परिक्षेत्र वन अधिकारी राजेंद्र पवार यांनी सांगितले.अंदाजे वीस लाख रूपये किंमत असलेली बिबट्याची कातडी विकण्यासाठी चौघे वाहनाव्दारे येथील येऊन जंगलाच्या प्रवेशव्दारावर आले होते.
ठळक मुद्देबिबट्याची कातडीसुमारे वीस लाख रूपये किंमतचौघाना येऊर जंगलाच्या प्रवेशव्दारावर साफळा रचून अटक