ठाणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवार ठरवून दिलेल्या खर्चाच्या मर्यादेपेक्षा किमान चारपट जास्त खर्च करतात, असा गौप्यस्फोट राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी केला. उच्च मध्यमवर्गीय, श्रीमंत, अधिक शिकलेल्या मंडळींमधील मतदानाचा अनुत्साह ही चिंतेची बाब आहे, अशा शब्दांत राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी लब्धप्रतिष्ठितांचे कान टोचले. या वर्गाचे मतदान वाढले पाहिजे. निवडणुकांमध्ये पैशांच्या बळाचा आणि समाजमाध्यमांच्या वाढत्या दुरुपयोगाबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली.
नवी मुंबई येथील ज्ञान केंद्र सभागृहात कोकण विभागीय कार्यशाळा अलीकडेच पार पडली. त्याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, मध्यंतरी गोखले इन्स्टिट्यूटकरवी आम्ही यावर अभ्यास करवून घेतला. तेव्हा असे निदर्शनास आले की, पक्ष आणि उमेदवार नेमून दिलेल्या खर्च मर्यादेपेक्षा चारपट जादा खर्च करत आहेत. सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आमच्यासाठी समान आहेत, असे स्पष्ट करून ते म्हणाले की, निवडणुकांमध्ये पैशांचा आणि समाजमाध्यमांचा दुरु पयोग रोखणे, हे आव्हान आपण सर्वांनी पेलायचे आहे. कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. ‘सुदृढ लोकशाहीसाठी सुदृढ निवडणुका’ या विषयावर या कार्यशाळेत सहभागी मान्यवरांनी यावेळी महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या. प्रारंभी विभागीय आयुक्त डॉ. पाटील यांनी कार्यशाळा घेण्यामागची भूमिका स्पष्ट करून चांगल्या गोष्टी घडत असतील, तर श्रेयवाद उपस्थित करून अडथळे आणण्याचे काम काही मंडळी करतात, अशी टिप्पणी केली. याकडे दुर्लक्ष करून निवडणूक यंत्रणा बळकट करावी, असे आवाहन केले.अर्ज रद्द होण्याचे प्रमाण घटलेनामनिर्देशन आणि शपथपत्र संगणकीकृत करणे आवश्यक केले आहे. त्यामुळे अर्ज रद्द होण्याचे प्रमाण घटल्याचे यावेळी उघड झाले. विद्यापीठात प्रथम वर्षांत प्रवेश करणाऱ्याविद्यार्थ्याने प्रवेश अर्जाच्या वेळी मी मतदारनोंदणी केली नसल्यास ती करेन, असे लिहून देणे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थांना भेटी देणे, याविषयीहीआवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी निवृत्त अपर मुख्य सचिव शहजाद हुसैन, सर्व जिल्हाधिकारी, नवी मुंबई महापौर आणि आयुक्तांसह पोलीस अधिकारी उपस्थित होते.