भिवंडी : चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तीच्या डोक्यात दगड घालून ठार मारणाºया तरूणांस फाशी द्यावी,या मागणीसाठी आज सायंकाळी ६ वाजता शहरातील ब्राम्हणआळीतून महिला सुरक्षा मंचच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.शहरातील रोशनबाग येथे गौतम चाळीतील महादेव सरजूप्रसाद यांच्या पानाच्या दुकानात त्याच परिसरांत रहाणाºया आबेद मोहम्मद अजमीर शेख (२०)याचे उधारीवरून भांडण झाले होते. त्याचा राग मनांत ठेऊन बदला घेण्याच्या उध्देशाने आरोपी आबेद याने महादेवची चार वर्षाची मुलगी पायल हिला एकटीला गाठून तीला जवळच्या झुडूपात नेले. त्या चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तीची निर्घुण हत्या करून तीचा मृतदेह तेथेच उघड्यावर ठेवला. ही घटना १ एप्रिल रोजी घडली होती. या घटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी ८ एप्रिल रोजी आबेद शेख यांस केवळ हत्येच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्यास भिवंडी कोर्टाने १४ दिवसांची पोलीस कोठडी दिल्याने पोलीसांनी केलेल्या तपासांत आबीदने पायलवर अत्याचार केल्याचे कबूल केल्याची माहिती भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय भिसे यांनी दिली. पोलीस कोठडी पुर्ण झाल्याने त्यास आज रोजी कोर्टात हजर करून जेलमध्ये पाठविण्यात आले.या घटनेबाबत महिलांमध्ये संताप व्यक्त केला जात होता.त्यामुळे भिवंडीतील महिला सुरक्षा मंचच्या वतीने चार वर्षाच्या पायलची हत्या करणाºया मारेकºयाला फाशीची शिक्षा द्या,तसेच कायद्याची योग्य अंमलबजावणी करा,अशा घोषणा देत महिला सुरक्षा मंचच्या महिलानी ब्राम्हणआळी येथुन सायंकाळी मोर्चा काढला. हा मोर्चा पुढे बाजारपेठ मार्गे पारनाका,ठाणगेआळी कासारआळी व पुढे शिवाजीचौकात नेण्यात आला. शिवाजी चौकात मोर्चाचे सभेत रूपांतर होऊन त्यामध्ये महिला सुरक्षा मंचच्या सुवर्णा रावळ यांच्यासह महिलांना भाषणे केली. या मोर्चात मीना कुंटे,सुगंधा टावरे,ममता परमाणी,कल्पना शर्मा आदि महिला सहभागी झाल्या होत्या.या मोर्चात हिंदू-मुस्लिम समाजाच्या महिला होत्या.तसेच बजरंगदलचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.