शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
4
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
5
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
6
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
7
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
8
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
9
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
11
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
12
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेशाद्रीने सांगितली आठवण
13
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
14
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
15
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
16
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
17
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
18
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
20
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!

चार वर्षांनंतर कळवा मेडिकल होणार सुरू

By admin | Published: January 18, 2016 1:57 AM

कळवा रुग्णालयातील मागील चार वर्षांपासून बंद असलेल्या मेडिकल स्टोअरचा मार्ग अखेर आता खुला झाला आहे. स्थायी समितीने फेरप्रस्तावाला मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यात

ठाणे : कळवा रुग्णालयातील मागील चार वर्षांपासून बंद असलेल्या मेडिकल स्टोअरचा मार्ग अखेर आता खुला झाला आहे. स्थायी समितीने फेरप्रस्तावाला मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यात मान्यता दिल्यानंतर ते पुढील आठवड्यात सुरू होणार असल्याची माहिती महापौर संजय मोरे यांनी दिली. ते डॉ. डी.वाय. पाटील हॉस्पिटल मेडिकल स्टोअर यांना चालविण्यासाठी देण्यात येणार आहे. त्यापोटी महिन्याला १४ लाख १० हजार म्हणजेच वर्षाला तब्बल १ कोटी ६७ लाखांचे भाडे पालिकेला मिळणार आहे. त्यानुसार, आता नव्या वर्षात या मेडिकलचा मार्ग मोकळा होणार आहे.कळवा हॉस्पिटलमधील मेडिकल स्टोअर २०१२ च्या सुमारास बंद झाले होते. त्यानंतर, नव्याने निविदा मागविल्या होत्या. या निविदेनुसार महिनाकाठी ११ लाख भाड्याचा प्रस्ताव ९ नोव्हेंबर २०१२ रोजी स्थायी समितीकडे सादर केला होता. परंतु, तो नामंजूर करून फेरप्रस्ताव सादर करण्यास सांगितले. त्यानुसार, हा प्रस्ताव फेरसादर करीत असतानाच त्याच वेळेस कळवा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट वेल्फेअर यांनी न्यायालयात दावा दाखल केल्याने ही प्रक्रिया थांबली होती. अखेर, याचा निकाल ३० नोव्हेंबर २०१४ ला लागला.