मुंबई : ठाणे येथील मुंब्रा, शीळ व कळवा आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर उपविभाग क्रमांक एक, दोन, तीन आणि मालेगाव ग्रामीण उपविभागातील वीजग्राहकांना उत्तम दर्जाची वीजसेवा मिळावी, म्हणून फ्रेंचाइजींची नेमणूक करण्यात आली आहे. १ मार्चच्या मध्यरात्रीपासून फ्रेंचाइजीद्वारे येथील वीजग्राहकांना सेवा देण्यात येईल.मुंब्रा, शीळ व कळवा या विभागासाठी टॉरेंट पॉवर, मालेगाव शहरातील उपविभाग क्रमांक एक, दोन व तीन आणि मालेगाव ग्रामीण उपविभागात येणारेभायेगाव, सायनी, दरेगाव, मालदे आणि द्याने या गावांसाठी कोलकाता इलेक्ट्रिक सप्लाय कॉर्पोरेशन लिमिटेडया कंपन्यांची फ्रेंचाइजी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने ठरवनू दिलेल्या वीजदरानुसारच वीजपुरवठा करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.अशा प्रकारची सेवा उपलब्ध करून देताना कोणत्याही प्रकारची अतिरिक्त शुल्काची आकारणी करण्यात येणार नाही. तक्रारींचे निवारण करण्यासाठी तक्रार निवारण केंद्राची स्थापना करण्यात आलेलीआहे. तक्रारींचे निवारण न झाल्यास महावितरणच्यानोडल आॅफिसच्या माध्यमातून त्यांचे निवारण करण्यात येणार आहे.
मुंब्रा, शीळ, कळव्यासोबतच मालेगावातही वीजग्राहकांच्या सेवेसाठी फ्रेंचाइजी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2020 5:03 AM