लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: अवघ्या साडेतीन वर्षांत दुप्पट रक्कम देण्याच्या प्रलोभनाने ठाणे आणि नवी मुंबईतील सुमारे २० महिलांची ४४ लाख ४५ हजारांची फसवणूक करणाऱ्या राजे काळे आणि सरोज काळे या दोघांविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे. या दोघांचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.ठाण्यातील कापूरबावडी येथील हायस्ट्रीट मॉलमधील वास्तू लॅन्ड रियलेटर्स आर. के. ग्रुप ऑफ कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास अवघ्या साडेतीन वर्षांतच दुप्पट रक्कम देण्याचे आमिष काळे यांनी नवी मुंबईतील ऐरोली येथील ६२ वर्षीय महिलेला दाखविले. त्यासाठी तिच्याकडून नऊ लाखांची तसेच इतर महिलांकडून काही रक्कम अशी ४४ लाख ४५ हजारांची रक्कम घेऊन फसवणूक केली. हा प्रकार ३ मार्च २०१४ ते १३ जानेवारी २०२२ या सात वर्षांच्या काळात सुरू होता. मूळ रक्कम आणि व्याजापोटी रक्कम परत न मिळाल्याने याप्रकरणी नवी मुंबईच्या या महिलेसह इतर महिलांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात फसवणूक तसेच एमपीआरडी चे कलम १९९९ तीनप्रमाणे १३ जानेवारी रोजी गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रियतमा मुठे या अधिक तपास करीत आहेत.
दुप्पट रक्कम देण्याच्या प्रलोभनाने ४४ लाख ४५ हजारांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2022 9:05 PM
अवघ्या साडेतीन वर्षांत दुप्पट रक्कम देण्याच्या प्रलोभनाने ठाणे आणि नवी मुंबईतील सुमारे २० महिलांची ४४ लाख ४५ हजारांची फसवणूक करणाऱ्या राजे काळे आणि सरोज काळे या दोघांविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे.
ठळक मुद्देठाणे, नवी मुंबईतील महिलांना गंडाकापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल