उल्हासनगर : चेकच्या बदल्यात ११ लाख ४५ हजार ८८७ रुपयांचे इलेक्ट्रिकल साहित्य घेऊन गेलेल्याचा चेक बाउन्स झाल्याने, व्यापारी मयूर राघानी यांना धक्का बसला. अखेर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात सुनील गोयल याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरात मयूर राघानी यांचे इलेक्ट्रिकल दुकान आहे. १ ते १६ मार्च दरम्यान सुनील गोयल या नावाच्या व्यापाऱ्याने मयूर राघानी यांच्याकडून चेक देऊन ११ लाख ४५ हजार रुपये किमतीचे इलेक्ट्रिकल साहित्य खरेदी केले. मात्र दिलेला चेक बँक खात्यात वठविण्यासाठी टाकला असता बाउन्स झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर, मयूर राधानी यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात जाऊन झालेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. अखेर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. अशाच प्रकारे इतरांचीही फसवणूक केली का? यातून पोलीस तपास करीत आहेत.