लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: क्रेडिट कार्ड व्हेरिफिकेशन करण्याच्या नावाखाली एका भामटयाने कळव्यातील संदीप चौधरी (३०) यांची दीड लाखांची फसवणूक केल्याची घटना नुकतीच खारेगाव येथे घडली. याप्रकरणी गुरुवारी कळवा पोलीस ठाण्यात फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.खारेगाव येथील रहिवाशी चौधरी हे ११ जानेवारी २०२१ रोजी त्यांच्या घरी असतांना त्यांना एका भामटयाने आपण एसबीआय बँकेतून बोलत असल्याची मोबाईलवरुन बतावणी केली. ‘तुमचे क्रेडिट कार्ड व्हेरिफेफिकेशन करायचे आहे,’ त्यासाठी तुम्ही तुमच्या कार्डची माहिती सांगा, नाहीतर तुमचे क्रेडिट कार्ड बंद होईल, असाही त्याने दावा केला. हाच दावा करीत त्यांच्याकडून त्याने एसबीआय क्रेडिट कार्ड आणि सीव्हीव्ही क्रमांकाची माहितीही घेतली. ही माहिती मिळताच त्यांच्या बँक खात्याच्या क्रेडिट कार्डमधून आॅनलाईनद्वारे एक लाख ५७ हजार २१५ रुपयांची फसवणूक केली. वारंवार पाठपुरावा करुनही आपली फसवणूक झालेली रक्कम परत न मिळाल्याने चौधरी यांनी अखेर याप्रकरणी ४ फेब्रुवारी रोजी फसवणूकीचा गुन्हा कळवा पोलीस ठाण्यात दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक शिरीष यादव हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
क्रेडिट कार्ड व्हेरिफिकेशन करण्याच्या नावाखाली दीड लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 8:44 PM
क्रेडिट कार्ड व्हेरिफिकेशन करण्याच्या नावाखाली दीड लाखांची फसवणूक कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल लोकमत न्यूज नेटवर्क ठाणो: क्रेडिट कार्ड व्हेरिफिकेशन करण्याच्या नावाखाली एका भामटयाने कळव्यातील संदीप चौधरी (30) यांची दीड लाखांची फसवणूक केल्याची घटना नुकतीच खारेगाव येथे घडली. याप्रकरणी गुरुवारी कळवा पोलीस ठाण्यात फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. खारेगाव येथील रहिवाशी चौधरी हे 11 जानेवारी 2021 रोजी त्यांच्या घरी असतांना त्यांना एका भामटयाने आपण एसबीआय बँकेतून बोलत असल्याची मोबाईलवरुन बतावणी केली. ‘तुमचे क्रेडिट कार्ड व्हेरिफेफिकेशन करायचे आहे,’ त्यासाठी तुम्ही तुमच्या कार्डची माहिती सांगा, नाहीतर तुमचे क्रेडिट कार्ड बंद होईल, असाही त्याने दावा केला. हाच दावा करीत त्यांच्याकडून त्याने एसबीआय क्रेडिट कार्ड आणि सीव्हीव्ही क्रमांकाची माहितीही घेतली. ही माहिती मिळताच त्यांच्या बँक खात्याच्या क्रेडिट कार्डमधून ऑनलाईनद्वारे एक लाख 57 हजार 215 रुपयांची फसवणूक केली. वारंवार पाठपुरावा करुनही आपली फसवणूक झालेली रक्कम परत न मिळाल्याने चौधरी यांनी अखेर याप्रकरणी 4 फेब्रुवारी रोजी फसवणूकीचा गुन्हा कळवा पोलीस ठाण्यात दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक शिरीष यादव हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
ठळक मुद्दे कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल