शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

जमिनीचे प्लॉट देण्याच्या नावाखाली तीन कोटींची फसवणूक: ‘दिशा’च्या संचालकाला अटक

By जितेंद्र कालेकर | Published: March 08, 2021 4:39 PM

जमिनीचे प्लॉट देतो, अशी बतावणी करीत राज्यभरातील २५ जणांची तीन कोटी १५ लाख ५४ हजारांची फसवणूक करणाऱ्या दिशा डायरेक्ट मार्केटिंग सर्व्हिसेस आणि यश इन्फ्राव्हेन्चर कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष नाईक याला ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी अटक केली आहे.

ठळक मुद्दे ठाणे आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई राज्यभरातील २५ गुंतवणूकदारांची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: जमिनीचे प्लॉट देतो, अशी बतावणी करीत राज्यभरातील २५ जणांची तीन कोटी १५ लाख ५४ हजारांची फसवणूक करणाऱ्या दिशा डायरेक्ट मार्केटिंग सर्व्हिसेस आणि यश इन्फ्राव्हेन्चर कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष नाईक याला ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी अटक केली आहे. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.ठाण्यातील घोडबंदर रोड, हिरानंदानी इस्टेट येथील रहिवाशी धर्मराज राव (६१) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिशा डायरेक्टचा संचालक संतोष आणि त्याची पत्नी सुजाता तसेच अन्य एक संचालक चेतन चव्हाण यांनी ठाण्यातील तीन हात नाका येथील इटर्निटी मॉल मध्ये २०१० ते २०१६ या काळात कार्यालय सुरु केले होते. याच कार्यालयातून वेगवेगळे प्रोजेक्ट सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्याद्वारे राज्यातील शहापूर तसेच सातारा, कर्जत आणि कसारा याठिकाणी या प्रोजेक्टमधील जमिनीचे प्लॉट देतो, असे सांगून वेगवेगळे प्रोजेक्ट दाखविले. पैसे गुंतविल्यावर दोन वर्षांच्या कालावधीनंतर जर गुंतवणूकदारास प्लॉट नको असल्यास त्यांनी गुंतविलेल्या रकमेच्या अर्धी रक्कम जास्त देऊन करार रद्द केला जाईल, अथवा प्लॉट पाहिजे असल्यास दोन वर्षांनंतर रितसर प्लॉटच्या सात बारा उताºयावर नाव नोंदवून प्लॉट गुंतवणूकदारांच्या नावावर केला जाईल, असेही अमिष दाखविले. दिशा डायरेक्टच्या संचालकांनी वेगवेगळया प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून ठरल्याप्रमाणे प्लॉट आणि भरलेली रक्कम परत न देता धर्मराज आणि त्यांच्या पत्नीची १५ लाख २३ हजार ८५० रुपयांची आणि इतर २४ गुंतवणूकदारांची तीन कोटी ३१ हजार ५९ रुपयांची अशी एकूण तीन कोटी १५ लाख ५४ हजार ९०९ रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सुरुवातीला १७ गुंतवणूकदारांनी १३ आॅगस्ट २०२० रोजी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात फसवणूक आणि अपहाराचा गुन्हा दाखल केला. यात आणखी गुंतवणूकदारानीही तक्रार केल्याने हे प्रकरण ठाण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले. पोलीस उपायुक्त सुनिल लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या पथकाने संतोष नाईक याला ५ मार्च २०२१ रोजी अटक केली आहे. उर्वरित आरोपींनाही लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी