लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: भारतीय नोटा देण्याच्या बदल्यामध्ये एक हजार ४४० इतके अमेरिकन डॉलर देण्याची बतावणी करीत डेनिस पाटील (४३, रा. भार्इंदर) यांची तीन लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.भार्इंदर येथील रहिवाशी डेनिस हे २४ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११ ते ११.३० वाजण्याच्या सुमारास बोरीवली येथील संजय गांधी राष्टÑीय उद्यानाच्या उडणपूलाजवळील परिवहन विभागाच्या कार्यालयात काम करीत होते. त्यावेळी रोहित नामक भामटा त्यांच्याकडे आला. त्याने डेनिस यांना अमेरिकन डॉलर दाखवून सुटया पैशांची मागणी केली. हे भारतीय चलन नसून त्याबाबत कारवाई होऊ शकते, असाही दावा केला. त्याचवेळी असे बरेच डॉलर आपल्या मित्राकडे असल्याचेही रोहितने त्यांना सांगितले. त्यानंतर २७ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास अभ्युदय को. आॅप. हौसिंग सोसायटी येथील राऊत शाळेच्या समोरील गल्लीमध्ये चेंदणी कोळीवाडा, कोपरी भागात रोहित आणि त्याच्या साथीदाराने आपसात संगनमत करुन ठरल्याप्रमाणे डेनिस यांच्याकडून तीन लाख रुपयांची रोकड घेतली. त्या बदल्यामध्ये एक हजार ४४० इतके अमेरिकन डॉलर देत असल्याची बतावणी करुन एक गडद निळया रंगाच्या कापडी पिशवीत ठेवलेले आणि चॉकलेटी रुमालामध्ये बांधलेले चलनाच्या आकाराचे इंग्रजी न्यूज पेपरचे कात्रण हे अमेरिकन डॉलर असल्याचे भासवून ते त्यांना देऊन तिथून पलायन केले. याप्रकरणी डेनिस यांनी २७ फेब्रुवारी रोजी कोपरी पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक आर. पी. साठे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
भारतीय नोटांच्या बदल्यात अमेरिकन डॉलर देण्याचे ेअमिष दाखवून तीन लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 4:38 PM
भारतीय नोटा देण्याच्या बदल्यामध्ये एक हजार ४४० इतके अमेरिकन डॉलर देण्याची बतावणी करीत डेनिस पाटील (४३, रा. भार्इंदर) यांची तीन लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल झाला आहे.
ठळक मुद्देकोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा