शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

कंत्राट मिळविण्याचे आमिष दाखवून 32 लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 12:20 AM

आरोपीस अटक; अन्य एका गुन्ह्यात मिळविला अंतरिम जामीन

ठाणे :  अंबरनाथच्या आयुध निर्माण कारखान्यामध्ये उपहारगृहाचे कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखवून, जगदीप दुबे (३८, रा. ब्रम्हांड, ठाणे) यांची ३२ लाखांची फसवणूक करणाऱ्या रोहित शेट्टी उर्फ अकबर पाशा (५१, रा. माजीवडा, ठाणे) याला ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने शनिवारी अटक केली. त्याला कासारवडवली पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.रोहित याने त्याचे साथीदार भगवान पवार (३६), पल्लवी पवार (३६), विठाबाई पवार (५५) आणि विनोद शेट्टी (३९) यांच्या मदतीने दुबे यांना अंबरनाथ येथील आयुध निर्माण कारखान्यातील उपाहारगृहाचे कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी त्यांच्याकडून जानेवारी, २०१६ ते ११ डिसेंबर, २०२० या काळात त्याने ३२ लाख रुपये घेतले. त्यानंतर, दुबे यांच्या नावाने उपाहारगृहाचे कंत्राट मंजूर झाल्याचा बनावट कार्यादेश त्यांना दाखविला. प्रत्यक्षात कोणतेही कंत्राट मिळवून न देता त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात ११ डिसेंबर रोजी तक्रार दाखल होती. दरम्यान, रोहित हा ठाण्यातील गोल्डन डाइज नाका येथे येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे १२ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास कोथमिरे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार संजय भिवणकर, प्रशांत भुरके, संदीप भांगरे, महेश साबळे आणि रोशन जाधव आदींच्या पथकाने त्याला २४ तासांमध्ये ताब्यात घेतले. त्याला कासारवडवली पोलिसांनी अटक केली असून, ठाणे न्यायालयाने त्याला १६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.दुसऱ्या नावाने वावरमार्च, २०२० मध्ये कासारवडवली येथील एका बारमध्ये झालेल्या हाणामारीच्या गुन्ह्यातही तो वॉन्टेड होता. यामध्ये त्याला अंतरिम अटकपूर्व जामीन मिळाला होता. रोहित हा अकबर पाशा या दुसऱ्या नावानेही वावरत होता.