लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: सोन्याचा हार देण्याच्या नावाखाली चक्क पितळेच्या धातूचा बनावट हार देऊन चार लाखांची फसवणूक करणाऱ्या एका महिलेसह दोघांविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात शनिवारी फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या दोघांचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.ठाण्याच्या वागळे इस्टेट, लुईसवाडी येथील रहिवाशी अशोक भिरुड (५८) यांना दीपाली (३०) आणि सुनिल (५०) या दोघांनी वापी येथे जुन्या वाडयात सोन्याचा हार सापडला असल्याची आधी बतावणी या दोन्ही भामटयांनी केली. तो खरेदी करावा यासाठी प्रथम त्या हारातील दोन मणी सोन्याचे असल्याचे सांगण्यात आले. याची खात्री करण्यासाठी भिरुड यांना ते देण्यात आले. ते मणी सोन्याचे असल्याची खात्री पटल्यानंतर त्यांची दिशाभूल करीत त्यांना पितळेच्या धातूचा हार देण्यात आला. त्याबदल्यात त्यांच्याकडून चार लाखांची रक्कम घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. हा प्रकार ४ जानेवारी २०२१ रोजी सकाळी १० ते २ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान घडला. वारंवार पाठपुरावा करुनही सोने किंवा चार लाखांची रक्कम परत न मिळाल्याने भिरुड यांनी अखेर याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात ६ फेब्रुवारी २०२१ रोजी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक ए. एस. तिडके हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
सोन्याचा हार देण्याच्या नावाखाली चार लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 8:27 PM
सोन्याचा हार देण्याच्या नावाखाली चक्क पितळेच्या धातूचा बनावट हार देऊन चार लाखांची फसवणूक करणाऱ्या एका महिलेसह दोघांविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात शनिवारी फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
ठळक मुद्देवागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हासोन्याच्या ऐवजी दिला पितळ धातूचा हार