शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
2
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
3
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक
5
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
6
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
7
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
8
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
9
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
10
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
11
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
12
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
13
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
14
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
15
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
16
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
17
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
18
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
20
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात

बनावट सह्या करून ठाण्यातील संस्थेचे ६३ लाख रुपये हडप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 7:15 PM

ठाण्यातील एका संस्थेच्या महत्वाच्या पदांवर बनावट ठरावाच्या आधारे ताबा मिळवल्यानंतर या संस्थेचे सुमारे ६३ लाख रुपये हडपणाºया कुटुंबाविरूद्ध ठाणे पोलिसांनी मंगळवारी गुन्हे दाखल केले.

ठळक मुद्देबनावट ठराव घेतल्याचा आरोपपती-पत्नीसह मुलीविरूद्ध गुन्हा दाखलठाणे पोलिसांची कारवाई

ठाणे : बनावट सह्या करून संस्थेची रक्कम परस्पर हडप करणाऱ्या ठाण्यातील एका कुटुंबाविरूद्ध नौपाडा पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला. बनावट ठरावाच्या आधारे सुमारे ६३ लाख रुपये हडपल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.ठाण्यातील श्री साई शहर व ग्रामीण विकास सामाजिक सेवा संस्थेचा हा वाद आहे. पोखरण रोड क्रमांक २ वरील गांधीनगरचे रहिवासी देवनारायण दसई यादव यांनी आपण या संस्थेचे सचिव आणि मुलगा निलेश यादव हा खजिनदार असल्याचा दावा नौपाडा पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीमध्ये केला आहे. वसंत विहारचे रहिवासी राजदेव शुभकरण यादव, त्यांच्या पत्नी गिरिजा राजदेव यादव आणि मुलगी प्रतिमा यादव यांनी बनावट ठरावाच्या आधारे आपण संस्थेचे अनुक्रमे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य असल्याचे भासवले. संस्थेचे नौपाडा येथील ठाणे मध्यवर्ती बँकेत खाते असून, बनावट ठरावाची कागदपत्रे आरोपींनी बँकेत दिली. त्याआधारे संस्थेच्या खात्यातून ६३ लाख ६४ हजार रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप देवनारायण दसई यादव यांनी केला आहे. २0१६ साली झालेल्या या घोळाची तक्रार यादव यांनी दिल्यानंतर नौपाडा पोलिसांनी राजदेव यादव आणि त्यांची पत्नी तसेच मुलीविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.नौपाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एच.जी. ओऊळकर या प्रकरणाचा तपास करीत आहेत. आरोपींनी संस्थेची महत्वाची पदे स्वत:कडे घेणाºया ठरावाची प्रत धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे दिली होती. हा ठराव धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे. त्यांनी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये संस्थेच्या खात्यातून रकमा काढल्या. आरोपींनी राजेश कन्स्ट्रक्शन नावाच्या एका कंपनीला २५ लाख रुपयांचा धनादेश दिला होता. ही कंपनी आरोपींशीच संबंधित असल्याचा संशय पोलिसांना आहे.ही वादग्रस्त संस्था महापालिकेकडून वेगवेगळी कामे घेते. २00३ साली या संस्थेला सार्वजनिक शौचालयाचे काम महापालिकेने दिले होते. त्यावेळी संस्थेमध्ये आर्थिक वाद निर्माण झाला होता. याशिवाय बँकेत बोगस खाते उघडून संस्थेच्या पैशांची अफरातफर केल्याचा प्रकार साधारणत: दहा वर्षांपूर्वी घडला होता. त्यावेळी तक्रारदार आणि आरोपींनी प्रकरण आपसात मिटवले होते.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCrimeगुन्हाfraudधोकेबाजी