कल्याण : दिव्यांग, डायलिसिस, एचआयव्हीग्रस्त, कर्करोगाचे रुग्ण आणि गर्भवती महिला यांना केडीएमटीच्या प्रवासी भाड्यात १०० टक्के सवलत देण्यात येईल, अशी घोषणा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवारी स्थायी समितीला सादर केलेल्या अर्थसंकल्पाद्वारे केली.सूर्यवंशी यांनी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांना सादर केलेल्या केडीएमसीच्या अर्थसंकल्पात महापालिकेची परिवहनव्यवस्था इतर ठिकाणच्या परिवहन व्यवस्थेप्रमाणे तोट्यात असल्याकडे लक्ष वेधले आहे. मात्र, परिवहन उपक्रमातील सर्व बस प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देणे व ही व्यवस्था कार्यक्षम पद्धतीने चालवण्यासाठी उपाययोजनांची पडताळणी करून यातील समस्या सोडवण्यात येतील, असा दावा सूर्यवंशी यांनी केला. अर्थसंकल्पात भांडवली खर्चाअंतर्गत सहा कोटी आणि महसुली खर्चासाठी ५० कोटी तर परिवहन कर्मचाऱ्यांना थकबाकी देण्यासाठी तीन कोटींची अशी एकूण ५९ कोटींची भरीव तरतूद केली आहे.इलेक्ट्रिक बसचा होणार समावेशपरिवहनच्या ताफ्यात पर्यावरणस्नेही बसचा समावेश करण्यात येईल. प्रवाशांच्या सुविधेसाठी स्मार्टकार्ड, मोबाइल टिकिटिंग, मोबाइल पास, जीपीआरएसद्वारे बसचे ठिकाण व वेळ समजण्यासाठी मोबाइल ट्रॅकर अशा आधुनिक सुविधा पुरवण्यात येतील.महापालिका क्षेत्रात जड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण केंद्र उपलब्ध नाही. त्यामुळे जड वाहनांचे प्रशिक्षण घेण्यासाठी येथील इच्छुकांना इतरत्र जावे लागते, ही अडचण विचारात घेता परिवहन विभागामार्फत जड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण कें द्र सुरू करण्यात येईल, या बाबी आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात केडीएमटीसाठी महत्त्वाच्या ठरल्या आहेत.
दिव्यांग, गर्भवतींना मोफत बस प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 12:14 AM