ठाणे : विशेष मोहीम घेऊन ३ दिवसांत शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग्ज काढून शहर होर्डिंग्जमुक्त करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले. तसेच सर्व विभागांना उत्पन्नाच्या वसुलीचे जे उद्दिष्ट दिले आहे, ते वाढीसाठी कठोर प्रयत्न करावेत, अन्यथा कारवाईला सामोरे जा, अशी ताकीद त्यांनी विभागप्रमुखांना दिली.सकाळी त्यांनी सर्व विषयांचा आढावा घेतला. यामध्ये पालिकेचे प्रकल्प, अतिक्रमणविरोधी मोहीम, जाहिरात फलक, वसुली आदी विषयांचा आढावा त्यांनी या वेळी घेतला. मालमत्ता आणि पाणीपट्टी वसुलीबाबत कोणतेही कारण ऐकून घेतले जाणार नाही, असे सांगून वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जेजे प्रयत्न करायला हवेत, तेते प्रयत्न करा, अशी सक्त ताकीद त्यांनी दिली. दरम्यान, शहरामध्ये ३ दिवसांची विशेष मोहीम घेऊन शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग्ज हटवावेत तसेच ज्या जाहिरातदारांनी अद्याप पैसे भरलेले नाहीत, त्यांच्या होर्डिंग्ज साइटवर कडक कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी या वेळी दिले.
तीन दिवसांत शहर होर्डिंग्जमुक्त करा
By admin | Published: January 12, 2016 12:38 AM