ठाणे : कोरोना महामारीचा प्रभावीपणे सामना करता यावा तसेच कोवीड बाधित रु ग्णांवर यशस्वी उपचार करता यावे यासाठी बाळकुम-साकेत येथे १०२४ बेडसचे तळ अधिक १० मजल्यांचे ठाणे कोवीड -१९ रु ग्णालय उभारण्यात आले आहे. या रुग्णालयात रुग्णांना मोफत उपचार मिळणार आहेत. त्यामुळे हा सर्वात मोठा फायदा कोरोना बाधीत रुग्णांसाठी होणार आहे. ठाणे महानगरपालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि एमसीएचआय, क्र ेडाई ठाणे युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व सुविधांनीयुक्त असे हे ठाणे हे हॉस्पीटल ठाणेकरांसाठी मोठी सुविधा ठरणार आहे. या रूग्णालयामध्ये एकूण १०२४ बेडस असून ५०० बेडस हे सेंट्रल आॅक्सीजनची सुविधा आहे. यातील ७६ बेडस हे आयसीयूचे असून १० बेडस डायलेसीस रूग्णांसाठी तर १० बेडस ट्राएजसाठी ठेवण्यात आलेले आहेत.या इमारतीच्या तळ मजल्यावर २४ आयसीयू बेडस, डायलेसिस कोवीड रु ग्णांसाठी १० बेड्स, १० बेड्स ट्राएजसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. दुसऱ्या आणि तिसºया मजल्यावर प्रत्येक २६ आयसीयू बेड्स आणि ११९ आॅक्सीजनचे बेड्स आहेत. तर चौथ्या मजल्यावर १५५ आॅक्सीजनचे बेड्स आहेत. पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर प्रत्येकी १५५ साधे बेड्स उपलब्ध आहेत.या इमारतीच्या सातव्या मजल्यावर ६९, आठव्या मजल्यावर ६७, नवव्या मजल्यावर ६७ बेड्स आणि दहाव्या मजल्यावर २२ बेड्स असे एकूण १०२४ बेडसची क्षमता या रु ग्णालयामध्ये आहे. आवश्यकता वाटल्यास या रग्णालयामध्ये अतिरिक्त ३०० बेड्स निर्माण करता येऊ शकणार आहेत. या रु ग्णालयामध्ये कोवीड लॅबचीही सुविधा निर्माण करण्यात आली आहे विशेष म्हणजे या ठिकाणी कोवीड रूग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार असून भाजन, रूग्णांना युनिफार्म, पॅथालाजी लॅब, एक्स रे, कोरोना टेस्टींग लॅब आणि मनोरंजनासाठी टी व्ही तसेच लाकर्सचीही सुविधाही आहे. त्याचप्रमाणे सुमारे १००० किलोवॅट क्षमतेची जनरेटर्सची सुविधाही निर्माण करण्यात आली आहे.चौकट - या ठिकाणी रुग्णांसाठी अद्ययावत सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच रुग्ण वाढल्यास येथे आणखी ३०० खाटांची व्यवस्था करता येणार आहे.(एकनाथ शिंदे - पालकमंत्री, ठाणे जिल्हा)कळवा आणि मुंब्रा येथील कोवीडसाठी अद्ययावत रुग्णालय लवकरात लवकर सुरु होणार असून त्याचे कामही युध्द पातळीवर सुरु आहे.(जितेंद्र आव्हाड - गृहनिर्माणमंत्री, महाराष्ट राज्य)
एक हजार बेडच्या कोवीड केअर सेंटरमध्ये मोफत उपाचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 5:23 PM