ठाणे : मूत्रपिंडाचे आजार, शस्त्रक्रिया व उपचार घेण्यासाठी रुग्णांना आता लांब जाण्याची गरज नाही. ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील धर्मवीर आनंद दिघे हार्ट केअर सेंटरमध्ये मूत्रपिंडाचे आजार व त्यासंबंधी शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्यात येणार आहे, तसेच याअंतर्गत संबंधित आजारांवरील सर्व उपचार मोफत होणार असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे सेंटर सुरू करण्याची सूचना केली होती. त्या अनुषंगाने ८ सप्टेंबरला झालेल्या महासभेत याबाबतचा ठराव सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकमताने मंजूर केला आहे. या सेंटरच्या माध्यमातून अनेक गरीब व गरजू रुग्णांना नि:शुल्क कार्डिओलाजिस्ट आणि कार्डियाक सर्जन कन्सल्टेशन, ईसीजी, २ डी इको, टीएमटी, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास व व्हॉल्व्ह सर्जरी, थ्रोमोबिलीशन उपचार, ट्रोप टी व ट्रोपोनिन टेस्ट, एबीसी चाचणी आदी वैद्यकीय सेवा पुरविल्या जात आहेत.
-----------------