ठाणे : स्मार्ट सिटीचा एक भाग म्हणून संपूर्ण शहर हे वायफायने कनेक्ट करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला असून त्यानुसार शहरात आतापर्यंत तब्बल ३१० ठिकाणी वायफायची यंत्रणा उभारून सध्या प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरू केली आहे. मागील सहा महिन्यांत तब्बल १ लाख ७५ हजार ठाणेकरांनी या सेवेचा मोफत लाभ घेतला आहे. परंतु, आता प्रत्यक्षात पुढील १० दिवसांत ती सुरू होणार असून ठाणेकरांना १०० रुपये रजिस्ट्रेशन फी देऊन ८०० केबीपीएसपर्यंत डेटा स्पीड मोफत मिळणार आहे.पालिकेने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पीपीपी म्हणजेच खाजगी लोकसहभागातून राबवला आहे. त्यामुळे यासाठी पालिकेला एकही पैसा खर्च न करता खाजगी ठेकदाराकडून वार्षिक ६१ लाख ९९ हजार ९९९ रुपयांचा आर्थिक फायदा होणार आहे. पालिकेने केवळ या ठेकेदाराला जागा उपलब्ध करून दिली आहे. महापालिकेच्या विजेच्या पोलचा यासाठी वापर केला जात आहे. स्मार्ट सिटीचा एक भाग म्हणून आणि ठाणेकरांना इंटरनेटशी कनेक्ट करून देण्यासाठी मागील वर्षी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हे पाऊल उचलले होते. वायफायची यंत्रणा बसवण्यासाठी ठाणे महापालिकेच्या ३२ हजार ५०० विद्युतपोलचा वापर केला जात आहे. यानुसार, ज्यांना या वायफायची सुविधा घ्यायची असेल, त्यांना सुरुवातीला १०० रुपये तेही एकदाच मोजावे लागणार आहे. यामध्ये ८०० केबीपीएसपर्यंत इंटरनेट मोफत असून त्यापुढील वापरासाठी चार्जेस द्यावे लागणार आहेत. यातून जे उत्पन्न मिळणार आहे, त्यातील १४.२३ टक्के हिस्सा अथवा ६१ लाख ९९ हजार ९९९ रुपये पालिकेला मिळणार आहेत.ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत ३१० ठिकाणी वायफाय उपकरणे बसवण्यात आली आहेत. त्यामध्ये शहरातील मुख्य भाग, वागळे, कोपरी, वर्तकनगर, वसंत विहार या परिसरांचा समावेश आहे. घोडबंदर, कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरांतही अनेक ठिकाणी ही यंत्रणा बसवण्यात आली असून उर्वरित भागात लवकरच ९० उपकरणे बसवणार आहेत.त्यामध्ये गेल्या सहा महिन्यांत एक लाख ७५ हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी विनामूल्य वायफाय सेवेचा लाभ घेतल्याची माहिती इनटेक वायफाय कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अमोल नलावडे यांनी दिली. परंतु, पुढील १० दिवसांत प्रत्यक्षात ती सुरू केली जाणार असून नागरिकांना रजिस्ट्रेशनसाठी केवळ १०० रुपये भरावे लागणार आहेत. यामध्ये त्यांना तब्बल ८०० केबीपीएसपर्यंत मोफत वायफाय सुविधा उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.मोबाइलमधील सेटिंगमध्ये जाऊन वायफायवर क्लिक करावे. त्यानंतर, कल्ल३ीूँ८5.ूङ्मे या नावावर क्लिक केल्यानंतर योजनेच्या नोंदणीसाठी एक पेज ओपन होईल किंवा वेब ब्राउजरमध्ये जाऊन कल्ल३ीूँ८5.ूङ्मे असे लिहून सर्च करावे आणि त्यानंतरही योजनेच्या नोंदणीसाठीही पेज ओपन होईल.दोन्ही पेजवर योजनेसाठी लॉगीन करावे आणि त्यानंतर नाव, आडनाव, मोबाइल क्र मांक आणि ई-मेल आयडी अशी माहिती भरून नोंदणी करावी. या नोंदणीनंतर लगेचच मोबाइलवर वन टाइम पासवर्ड (ओटीपी) येईल. ब्राउजरच्या पेजवर मोबाइल क्र मांक तथा ओटीपी टाकून लॉगीन करावे लागणार आहे. त्यानंतर, मोबाइलमध्ये वायफाय यंत्रणा सुरू होईल. या नोंदणीसाठी आॅनलाइनद्वारेच १०० रुपये शुल्क आकारणार आहेत.पावणे दोन लाख नागरिकांनी घेतला लाभ-सहा महिन्यांत एक लाख ७५ हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी विनामूल्य वायफाय सेवेचा लाभ घेतल्याची माहिती इनटेक वायफाय कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अमोल नलावडे यांनी दिली. पुढील १० दिवसांत प्रत्यक्षात ती सुरू होणार असून नागरिकांना रजिस्ट्रेशनसाठी केवळ १०० रुपये भरावे लागणार आहेत. यामध्ये त्यांना तब्बल ८०० केबीपीएसपर्यंत मोफत वायफाय सुविधा उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ठाणेकरांना मोफत वायफाय, सध्या प्रायोगिक तत्त्वावर : पुढील १० दिवसांत प्रत्यक्षात होणार कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 3:02 AM