लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : सुशसान, पारदर्शिता, समान संधी आणि वसुधैव कुटुम्बकम् याचा एकत्रित विचार म्हणजे रामराज्य. मोदींनी दहशतवादमुक्त भारत, गरिबीमुक्त बार, परिवावारवाद मुक्त भारत, महिलांचा सन्मान करणारा भारत, आत्मनिर्भरभारत, एक भारत, श्रेष्ठ भारत या सगळ्या रामराज्याच्या संकल्पना मांडल्या आहेत. दहशतवादापासून मुक्तीची सुरूवात प्रभू श्रीरामांनी केली. सज्जन शक्तीला त्रास देणाऱ्या राक्षसांचा निपात श्रीरामाने केला. त्याचप्रमाणे भारतातील दुर्जन शक्ती, आहेत, खिळखिळ करणाऱ्या शक्ती, दहशतवाद माजवणाऱ्या शक्तींचा निपात होणारच हे मोदी यांनी दाखवून दिले. आज आवश्यकता पडली तर सर्जिकलस्ट्राईक, एअर स्ट्राईक होतो. ३७० कलम हटवून दुर्जन शक्तीला सांगितले जाते भारताचे तुकडे तुम्हाला करुन देणार नाही असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात केले.
गावदेवी मैदाने येथे सुरू असणाऱ्या रामायण महोत्सवाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते म्हणाले की, राममंदिराच्या ठिकाणी मस्जीद कधीच नव्हते. मीर बाकीने देखील कधी तेथे नमाज अदा केली नाही. बाबरीचा मस्जीदचा तयार केलेला ढाचा तो कलंकाचा ढाचा होता आणि तो गुलामीचा ढाचा ६ डिसेंबर १९९२ ला तोडून त्याठिकाणी पुन्हा एकदा राम मंदिराची स्थापना केली. त्यावेळी नारा होता ‘रामलल्ला हम आएंगे, मंदिर वही बनाएंगे’, आता नवीन नारा आहे ‘रामलल्ला हम आएंगे, मंदिर भव्य बनाएंगे आता भव्य मंदिर होत आहे. २२ जानेवारीचा दिवस कारसेवकांकरीता आनंदाचा दिवस आहे. यानिमित्ताने नविनभारताची निर्मिती मोदी करत आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणो गुलामगिरीची अंतिम निशाणी आपण संपवत आहोत आणि त्या ठिकाणी रामलल्ला येत आहे. गेल्या ९ वर्षांत वेगवेगळ्या योजनेंच्या माध्यमातून २५ कोटींच्यावर लोक गरिबीरेषेच्यावर आलेत. हा जगाच्या इतिहासातला रेकॉर्ड आहे. ज्यांच्या मनात, कामात राम त्यांच्या हातून हे घडते, असे फडणवीस म्हणाले.
रामराज्याची संकल्पना मांडत मोदींनी हे कार्य केले. राजीव गांधी म्हणायचे मी दिल्लीवरुन एक रुपया पाठवतो तेव्हा शेवटच्या माणसाला २५ पैसे मिळतात आणि उर्वरित ८५ पैसे व्यवस्था खाऊन टाकते पण मोदींनी सांगितले, मी एक रुपया पाठवेल आणि तो शेवटच्यापर्यंत एक रुपयाच पोहोचेल अशी भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था मोदींनी तयार केली. श्रीरामांच्या चरित्रात परिवारवाद पाहायला मिळत नाही. त्यांच्या पूर्ण जीवनामध्ये परिवारापेक्षा समाज श्रेष्ठ होता. राजकीय व्यक्तीच्या परिवारातल्या लोकांनी त्यांचे नात्यात आहे यापेक्षा आपल्या कर्तुत्वावर राजकारणात आले पाहिजे. प्रभू श्रीराम आणि छत्रपती शिवराय यांच्याकडून प्रेरणा घेऊन मोदींनी सामान्य माणसाला अधिकार देत त्यांना लोकशाहीमध्ये सहभागी करून घेण्याचे काम त्यांनी केले.