शाम धुमाळ, कसारा: मुबंई नाशिक रेल्वे मार्गांवरील कसारा रेल्वे स्थानका पासून 600 मिटर अंतरावर नाशिक कडे जाणारी मालगाडी घसरली असून मालगाडीचे दोन डबे पलटी झाले आहेत.परिणामी या मुळे फ्लॅट फॉर्म नंबर एक वरून नाशिक कडे जाणारी वाहतूक पूर्ण पणे ठप्प झाली आहे .
आज रविवारी संध्याकाळी सात वाजून 15 मिनिटांच्या सुमारास एक माल वाहू कटेनर मालगाडी इगतपुरी च्या दिशे कडे जात असताना रेल्वे ट्रॅक क्रॉस करते वेळी मालगाडीचे इंजिन पासून चे 5 डब्बे रेल्वे रुलावरून वरून खाली घसरले त्या 5 डब्या पैकी मालगाडीचे 2 डब्बे कपलिंग तोडून पलटी होऊन दुसऱ्या रेल्वे ट्रॅक वर पडले परिणमी या मार्गांवरील दोन्ही मार्गिकेवरील नाशिक कडून मुबई व मुबई कडून नाशिक जाणारी वाहतूल विस्कलीत झाली असून
वाहतूक पुरवर्त करण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्न करीत आहेत. या अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन ,व आपघात नियंत्रण पथक ,रेल्वे पोलीस,रेल्वे सुरक्षा बल चे अधिकारी,कर्मचारी घटनास्थली दाखल आहेत.