कुमार बडदे मुंब्रा : मनातील काही गोष्टी कुटुंबातील सदस्यांकडे व्यक्त करता येत नाहीत, त्या हक्काने ज्याच्याकडे व्यक्त करता येतात, तो म्हणजे मित्र. जीवन जगत असताना आयुष्याच्या चांगल्या-वाईट प्रत्येक क्षणाला वेळोवेळी असे मित्र भेटतात. अशा मित्रांसाठी समर्पित असलेला मैत्री दिवस (फ्रेण्डशिप डे) रविवारी सोशल मीडियावर शेरोशायरी तसेच चारोळ्यांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला.
कोरोनाच्या सावटामुळे सध्या मर्यादित प्रमाणावर वाहतूक व्यवस्था सुरू आहे, तसेच खाजगी वाहनांवरदेखील प्रवासीसंख्येबाबत मर्यादा घालण्यात आल्या आहेत. मित्रांची भेटण्याची ठिकाणे असलेल्या शाळा, महाविद्यालये, अनेक कार्यालये ही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या बंद आहेत. यामुळे मैत्री दिनाच्या दिवशी इच्छा असूनही बहुतांश मित्रांना एकमेकांना भेटता आले नाही. त्यामुळे त्यांच्या मनात मित्रांबद्दल असलेल्या भावना त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या.मित्र हे मित्रच असतात. त्यांच्यात सख्खे, चुलत, मावस, सावत्र नसतात. तिला इयत्ता नसते, तिला तुकडी नसते, जिला वर्ग नसतो, ती कायम मैत्री असते.तिला जात, पात, धर्म नसतो, ती कायमची मैत्री असते. जिला हार, जीत, व्यवहार माहीत नसतो, ती कायम मैत्री असते. जिला रंग, रूप नसते तरीही ती सुंदर असते. कारण, ती खरी आणि कायमची मैत्री असते. जिथे आपल्या भावना व्यक्त करता येतात, जिथे आपले दु:ख मनमोकळेपणाने व्यक्त करता येते, असे हक्काचे नाते म्हणजे मैत्री. जब दोस्त प्रगती करे तो गर्व से कहना की, वह मेरा दोस्त है, और जब वह मुसीबत मे हो तो गर्व से कहना की मै उसका दोस्त हूं. अनोळखीअनोळखी म्हणत असतानाच अचानक एकमेकांची सवय होऊन जाते, ती मैत्री.मैत्री असावी फासाचा दोर पाहिल्यावर तो माझ्या गळ्यात घाला म्हणून भांडणाऱ्या भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेवसारखी. उतरत्या वयात, सांजवेळी ऐकू यावी, अशी सुंदर तान आणि आयुष्याच्या रुपेरी पुस्तकात सुवर्णाक्षरांनी लिहावे, असे पान म्हणजे मैत्री. आग लगी जब मेरे घर मे दोस्त ने पुछा क्या-क्या बचा है, मैने कहा सिर्फ मै बचा हूं, तो उसने गले लगाकर कहा तो फिर जला ही क्या है.मित्र म्हणजे आधार, आपुलकी, विश्वास आणि अनमोल साथ. मित्र जोडावेत शिवाजी महाराजांसारखे ज्यांच्या साथीने जग जिंकता येईल. मैत्री टिकावी संभाजीराजांसारखी ज्यांच्याबरोबर मरतानासुद्धा भागीदारी करता येईल.तुफान मे कश्तियो को किनारे भी मिल जाते है, जहान मे लोगों को सहारे भी मिल जाते है. दुनिया मे सबसे प्यारी है जिंदगी, कुछ आप जैसे दोस्त जिंदगी से भी प्यारे मिल जाते है, आदी शेरोशायरी, चारोळ्या व्हायरल करून मित्रांबद्दल असलेल्या त्यांच्या भावना व्यक्त केल्या.