- जान्हवी मोर्ये डोंबिवली : ऑगस्टचा पहिला रविवार हा फ्रेण्डशीप डे म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने आपल्या आवडत्या मित्र-मैत्रिणींना भेट देण्यासाठी शुभेच्छापत्र, विविध भेटवस्तू हमखास खरेदी केली जातात. परंतु, आता त्याची क्रेझ कमी झाल्याचे दिसून येत आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा २० टक्क्यांनी विक्री कमी झाल्याची माहिती विक्रेते महेश मुणगेकर यांनी दिली. दरम्यान, महाविद्यालयांना रविवारी सुटी असल्याने अनेकांनी शनिवारीच हा दिवस साजरा केल्याचे पाहायला मिळाले.फ्रेण्डशीप डेच्या निमित्ताने यंदाच्या वर्षी विविध प्रकारचे शो-पिस, मग, शुभेच्छा पत्रे, परफ्युम, सॉफ्ट टॉइजने दुकाने सजली आहेत. एरव्ही आठ दिवस अगोदरपासून खरेदीला सुरुवात होते. मात्र, यंदा शनिवारपर्यंत भेटवस्तूंची फारशी खरेदी झालेली नाही. शनिवारी सकाळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी टी-शर्ट, मार्करची खरेदी केली. यंदा कोणत्याच भेटवस्तूंच्या किमतीत वाढ झाली नाही. फ्रेण्डशीप बॅण्ड पाच ते ते ९९ रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. तसेच शो-पिसच्या किमती ३९९ ते ५९९ रुपयांपर्यंत आहेत. पावसामुळेही फ्रेण्डशीप डेच्या खरेदीवर परिणाम झाला असावा, असेही मुणगेकर यांनी सांगितले. रंजन गड्डा म्हणाल्या, फ्रेण्डशीप डेच्या खरेदीला चांगला प्रतिसाद दिसत नाही. अंगठी, शुभेच्छा पत्रे, कडे, रिबिन, मार्कर यासारखे साहित्य बाजारात आले आहे.शाळा-महाविद्यालयांत फ्रेण्डशीप डे साजरा करण्यास बंदी आहे. त्यामुळे विद्यार्थी बाहेर हा दिवस शाळा-महाविद्यालायाबाहेर हा दिवस साजरा करतात. तरीही भेटवस्तू खरेदीचा ओढा कमी झाला आहे. यंदाच्या वर्षी किमतीत कोणतीही वाढ नाही. अंगठी पाचरुपयांपासून, रिबिन १० ते २५ रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. तर, मार्कर १० रुपयांला बाजारात उपलब्ध आहेत.फ्रेण्डशिप डे रविवारी फडके रोडवर साजरा करणार आहे. मित्रमैत्रिणींसाठी भेटवस्तू खरेदी केली नसली, तरी त्यांना फ्रेण्डशिप बॅण्ड बांधणार आहे. यापूर्वी शाळा सुटल्यावर मित्रमैत्रिणींच्या हातावर मार्करने नावे लिहून हा दिवस साजरा करत होते.- तनीषा सुपे, वझे-केळकर महाविद्यालयफ्रेण्डशिप डे ला पूर्वी फडके रोडला जात होतो. पण, दोन वर्षांपासून तेथे जाणे थांबवले आहे. फडके रोडला खूप गर्दी असते. तसेच सर्व मित्र भेटतात, असे नाही. आता तर व्हॉट्सअॅपची सुविधा असल्याने त्यावरूनच शुभेच्छा देते.- युक्ता जोशी, डोंबिवली
‘फ्रेण्डशिप डे’ची क्रेझ झाली कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2019 12:11 AM