मुंब्राः येथील बायपास रस्त्यावरून ४० टन लोखंडाचे रोल घेऊन जाणाणाया ट्रकचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने तो उलटल्याची घटना सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडाली. या ट्रकमधील इंजिन ऑइलची रस्त्यावर गळती झाल्याने त्यावरून जाणारी वाहनांना अपघात होऊ नये, यासाठी या रस्त्यावरून ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक थांबविली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी रस्त्यावर माती टाकून सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत सुरू केला. दरम्यानच्या काळात येथील रस्त्यावर वाहतूककोंडी झाली होती, अशी माहिती मुंब्रा अग्निशमन दलाचे केंद्र अधिकारी तांबेश्र्वर मिश्रा तसेच ठामपाच्या आप्तकालीन विभागाचे प्रमुख अधिकारी संतोष कदम यांनी दिली. दरम्यान, ट्रकमधून खाली पडलेले लोखंड हायड्राच्या साहाय्याने पुन्हा ट्रकमध्ये ठेवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते, अशी माहिती मुंब्रा वाहतूक शाखेचे (उपविभाग) वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप पाटील यांनी लोकमतला दिली.
मुंब्रा बायपासवर इंधन गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 4:41 AM