- नितीन पंडित, भिवंडीएका बाजूला भारत विविध क्षेत्रात प्रगती करत असला तरी दुसऱ्या बाजूला खास करून ग्रामीण भागात कुपोषित बालके आढळून येत आहेत. भिवंडीसारख्या परिसरात अशी बालके आढळल्याने हा चिंतेचा विषय आहे. सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे, हेही नाकारून चालणार नाही.मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भिवंडीत कुपोषणाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने सरकारच्या कुपोषण निर्मूलनाबाबतच्या योजना केवळ कागदावरच असल्याचे दिसत आहे. कुपोषणामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या एका तीन वर्षीय मुलीमुळे हे वास्तव समोर आले आहे. भिवंडी तालुक्यातील दाभाड व चावे येथील वीटभट्टीवर काम करणाºया मजुराच्या मुलीस श्रमजीवी संघटनेने रु ग्णालयात दाखल करण्यात आले होते . भूमिका शनवार वय तीन वर्षे असे कुपोषित बालिकेचे नाव असून तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी ठाण्यात दाखल केले आहे.मूळ पालघर जिल्ह्यातील शिसने येथील विलास मागील एक महिन्यापासून भिवंडी तालुक्यातील दाभाड येथील वीट भट्टीवर मजुरीचे काम करत आहेत. श्रमजीवी संघटनेच्या गावपातळीवर बैठका सुरू असून त्यासाठी तालुक्यातील कार्यकर्ते ग्रामीण भागात फिरत असताना दाभाड येथे सुरेखा ही महिला आढळली. तिच्याकडे मुलीबाबत चौकशी केली असता ती आजारी असल्याचे समजल्याने कार्यकर्ती आशा भोईर यांना या मुलीच्या कुपोषणाचा अंदाज आल्याने त्यांनी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी घेऊन गेल्या. तेथे मुलीचे वजन अवघे सहा किलो भरले. मुलगी अतितीव्र कुपोषित असल्याचे निदर्शनास आल्याने तिला रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तालुक्यातील चावे गावातील अंगणवाडीतही सात कुपोषित बालके आढळली. वीटभट्टीवर मजुरी करणाºया मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढत असल्याचे निदर्शनास आले. एकीकडे सरकार कुपोषित बालकांसाठी योजना राबवत असते. परंतु खºया अर्थाने सरकारच्या कोणत्याही योजनांचा लाभ वीटभट्टीवर काम करणाºया कामगारांपर्यंत पोहचतच नसल्याची धक्कादायक कबुली या पालकांनी दिली.वीटभट्टीवर भिवंडीतील आदिवासी पाड्यांबरोबरच शहापूर , मुरबाड , जव्हार, मोखाडा तालुक्यातील आदिवासी कामगार म्हणून काम करतात. विशेष म्हणजे दिवसरात्र या मजुरांना वीटभट्टी मालकांकडून राबविले जाते, मात्र त्यातून त्यांना दिली जाणारी मजुरी तुंटपुजी असल्याने मेहनत करूनही या वीटभट्टी कामगारांना नेहमीच आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. अनेकवेळा या मजुरांना दोन वेळचे जेवणही मिळत नाही. वीटभट्टीवर सहज फेरफटका मारला तर ही बाब निश्चितच निदर्शनास आल्याशिवाय राहत नाही. तर पोटाच्या खळगीबरोबरच या मजुरांच्या मुलांना खावटीबरोबरच शिक्षणापासूनही वंचित राहण्याची वेळ आली आहे.सरकार धोरण ठरविते मात्र त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही हीच खरी शोकांतिका आहे. मजुरी करूनही पुरेसे अन्न मिळत नसल्याने अनेक वीटभट्टी मजूर स्वत: उपाशी राहून आपल्या ताटातील अन्न आपल्या मुलांना देतात. कधी कधी तर या चिमुकल्यांच्या ताटात फक्त भात तर कधी त्यांनाही उपाशी पोटीच झोपावे लागत असल्याने या मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण वाढले आहे. बालविवाह हेही त्यामागे एक कारण आहे.अंगणवाडी सेविकांनाच करावा लागतो खर्चभिवंडीतील केवळ दोन ते चार आदिवासी पाड्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात १० ते १२ कुपोषित बालके आढळली. अंगणवाडी सेविकांनी सांगितले कि सरकार कुपोषित बालकांसाठी विविध योजना राबवतात.मुलांसाठी मिळणारा उपयुक्त आहार वेळेवर मिळत नसल्याने स्वत: खर्च करून मुलांसाठी आहार आणावा लागतो. परंतु अंगणवाडीच्या सेविकेला चार-चार महिने पगार दिला जात नाही मग हा खर्च आम्ही कधी पर्यंत करणार?वेळेवर आहार मिळत नसल्याने मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण वाढत असून मुलांची उंची व वजनात घट होते.
भिवंडीचे भविष्यात मेळघाट होऊ नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 10:58 PM