भिवंडी: तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या हद्दीत मणीबाई कंपाऊण्ड येथे प्लास्टिक मणी,प्लास्टिक दाणे व केमीकलचा साठा असलेल्या बंद गोदामास आज सोमवार रोजी सकाळी १०-५० वाजताच्या सुमारास भिषण आग लागली.या आगीत लाखो रूपयांचा माल जळून भस्मसात झाला. सदर गोदामाजवळ असलेल्या पेट्रोलपंपा जवळ आगीचे लोण जाऊ नये म्हणू्न अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझविण्यासाठी शर्थ केली. तर हा पेट्रोलपंप महामार्गालगत असल्याने भिवंडी-ठाणे मार्गावर वहानांची मोठी वहातूक कोंडी झाली होती.भिवंडी-ठाणे महामर्गावरील रहानाळ ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात मोठ्या संख्येने बेकायदेशीरपणे बांधकाम करून साठवणूक केलेल्या केमीकलची गोदामे आहेत.वारंवार या गोदामांना सुरक्षीततेच्या अभावी आगी लागण्याचे प्रकार घडत असतात. आज सकाळी रिलायन्स पेट्रोलपंपाच्या मागे मनीबाई कंपाऊंड येथील घर क्रमांक ९१२/८ या मुकेश गुप्ता यांच्या मालकीच्या गोदामास आग लागली.या गोदामात प्लास्टिक मणी बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल,मण्यांना रंग देण्यासाठी लागणारे केमीकल तसेच बनविलेल्या मोत्यांच्या माळा व इतर साहित्य साठविलेले होते. या बंद गोदामांतून अचानकपणे धुर निघून लागल्याने परिसरांतील गोदाम कामगारांनी आग लागल्याची खबर स्थानिक लोकांसह पोलीसांना दिली. पोलीसांनी ताबडतोब मनपाच्या अग्निशामक दलास घटनास्थळी रवाना केले. तोपर्यंत गोदामातील आगीने रौद्ररूप धारण केले. केमीकलच्या ड्रमचे स्फोट होऊ लागल्याने गोदामाचे पत्र्याचे छप्पर कोसळले आणि परिसरांत मोठ्या प्रमाणांत धूर पसरला.आगीच्या ज्वाळा पसरू लागल्याने परिसरांत घबराट निर्माण झाली. ही आग विझविण्यासाठी कल्याण,डोंबीवली व ठाणे येथील अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले होते. परंतू मनपाच्या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. सदर आग लागलेल्या गोदामापासून काही अंतरावर असलेल्या पेट्रोलपंपाला तसेच गोदामांतील कामगारांना आणि परिसरांतील नागरिकांना धोका निर्माण होऊ नये म्हणू त्यांना सुरक्षीत ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला. रिलायन्स पेट्रोलपंप हा भिवंडी-ठाणे मार्गालगत असल्याने या मार्गावरील वहातूकीला देखील धोका निर्माण झाल्याने या मार्गावर प्रचंड वहातूक कोंडी झाली होती. त्यामुळे प्रवाश्यांचे हाल झाले.ही आग विझविण्यासाठी अग्निशाामक दलाच्या जवानांनी पाण्याबरोबर मॅकेनिकल फोमचा वापर करून ही आग दुपारी अडीच वाजता आटोक्यात आणली. मिळालेल्या माहिती नुसार या गोदाम कंपाऊंड मध्ये हमालीचे काम करणाऱ्या दोन मद्यपी हमालांमध्ये झालेल्या भांडणात एका हमालाने माचीसची जळती कांडी या गोदामात फेकल्याने हि आग लागल्याचे बोलले जात आहे.त्या दिशेने नारपोली पोलीस ठाण्याचे पोलीस तपास करीत आहेत.परंतू या गोदामांत केमीकल व ज्वलनशील पदार्थ असताना देखील गोदाम मालकाने आगप्रतिबंधक उपाय योजना केली नसल्याचे सांगीतले जाते.
भिवंडीतील प्लास्टीक मण्याच्या गोदामास आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 5:11 PM
भिवंडी : तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या हद्दीत मणीबाई कंपाऊण्ड येथे प्लास्टिक मणी,प्लास्टिक दाणे व केमीकलचा साठा असलेल्या बंद गोदामास आज सोमवार ...
ठळक मुद्देप्लास्टिक मण्यांच्या गोदामास लागली आगआग विझविण्यासाठी पाण्याबरोबर केला फोमचा वापरजळती कांडी गोदामात फेकल्याने आग लागल्याचा संशय