ठाणे : मराठी सांस्कृतिक जीवनात फार मोठा सहभाग असेल तर गदिमा, बाबुजी व पु. ल. देशपांडे या तीन दिग्गज कलावंताचा, यांनी मराठी मनाला व आखिल विश्वाला आपल्या अमोदय लेखनी व वाणीने इतक समृद्ध करुन ठेवल आहे की मराठीतील उंच गिरीशिखरे. या उंच गिरीशिखरांवर नेण्याचे काम स्वरयोग प्रस्तुत रिझर्व बँकेतून मैनेजर या पदावरुन सेवानिवृति झालेल्या गिरगावचे प्रदीप देसाई यांनी आपल्या रसाळ वाणीतून 'मला भावलेले कलावंत' या एकपात्री कार्यक्रमातून करुन रसिक प्रेक्षकांना या दिग्गज कलावंतीचे अनेक पैलू उलगडून दाखविले.
या तीन कलावंताचा त्यांच्या शताब्दीवर्षानिमित्त विशेष कार्यक्रम ब्रह्मांड कट्टयावर करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात बाबुजींपासून करण्यात आली. बाबुजीचे खरे नाव रामचंद्र फडके व त्यांचा जन्म कोल्हापुर येथे झालेला. बाबुजीचे वामनराव पाध्ये हे गुरु होते. बाबुजीनी हीराबाई बडोदेकर, के. एस. सेहगल, बालगंधर्व या दिग्गजाच्या गायकीचा अभ्यास केला. बाबुजीना खर तर इंजिनियर व्हायचे होते. तथापीते गायक व संगीतकार बनले. बाबुजीना एच. एम. व्ही. चे वसंत कामेरकर यांनी संधी दिली. बाबुजीचा उच्चारांना महत्वाचे मानत. त्यांचा विवाह 29 मे 1950 रोजी ललीता देवूळकर या प्रसिद्ध पाश्वगायिकेशी झाला. सदर विवाह प्रसंगी प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांनी मंगळाष्टका म्हटली होती. आपल्या सांगतिक कारकिर्तीमध्ये 84 चित्रपटांना संगीत 114 इतर गाणी स्वरबध्द , 56 गाणी गीत रामायणातील म्हटलेली आहेत. बाबुजी हे प्रखर राष्ट्रभक्त व सावरकर भक्त होते. सावरकर प्रतिष्ठान स्थापन करुन सावरकरा वरील चित्रपट पूर्ण करुन तो प्रकाशित केला.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यावर प्रदीप देसाई यांनी ग. दि. मा. यांची माहीती सांगताना गदिमांचे नाव गजानन दिगंबर माडगुळकर पंरतु खरे आडनाव कुलकर्णी असे होते. त्यांना गावाचा अभिमान असल्याने व माडगुळ या गावी त्यांचा जन्म झाला त्यामुळे माडगुळकर नाव धारण केले. त्यांनी आता पर्यंत 600 गाणी लिहली आहेत. त्यांचा मित्रानी त्यांना एकदा सांगितले की 'ळ' हा शब्द असलेले एकही गाणे तु लिहलेले नाही. गदिमानी लगेच "घन निळा लडी वाळा" हे गाणे लिहले ते आज अजरामर गीत झाले आहे. गदिमा हे खुप रागीट व तापट होते पण तितकेच प्रेमळ देखील होते. त्यांची श्रीरामावर भक्ती असल्याने त्यांच्या सिध्दहस्त लेखणीतून दैवी चमत्काराने आजवर सर्वांना अदभूत भक्ती व शक्तिचा मिलाप घडलेले गीत रामायण लिहून पुर्ण झाले.
कार्यक्रमाच्या तिसऱ्या व शेवटच्या टप्प्यात बहुआयामी व्यक्ति पु. ल. देशपांडे यांचे बरेच किस्से उलगडले. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे हे वेगळचं रसायन होते. पु. ल. हे फार काळ नोकरीत रमले नाही. पु. ल. ना हार्माेनियमची आवड होती. तर संगीतातील प्राथमिक शिक्षण हे राजोपाध्याय यांचेकडे पुर्ण केले. चार्ली चैपलिन, रविंद्रनाथ टागोर त्यांचे गुरु. 1955 साली आकाशवाणीवर निर्माता म्हणून काम केले. राधा व ऑपेरा बिल्हण ह्या सांगतिका निर्माण केल्या. त्यांचा खास गाजलेला चित्रपट गुळाचा गणपती हा चित्रपट म्हणजे सब कुछ पु.ल. होता. तथापि या चित्रपटाच्या पहिल्या खेळासाठी (प्रीमियर )त्यांना निमंत्रण नव्हते. त्यांनी स्वत:, सुनिताबाई व राज्याध्यक्ष यांनी तिकीटांच्या लाईन मध्ये उभे राहून तिकीटे काढली व चित्रपट पाहीला. पु. ल. हे महाराष्ट्रातील रसिक प्रक्षेकांच्या पत्रांना स्वत: उत्तर द्यायचे. पु. ल. नी सर्व रसिकांना आयुष्यभर निख्खल आनंद दिला. त्यांची ईच्छा प्रकट केली होती माझ्या जाण्यानंतर माझा पुतळा उभारु नका, पुतळा उभारलाच तर पुतळ्याखाली दोन अक्षर लिहा हा माणूस आनंदयात्री होता. या माणसाने भरभरुन आनंद दिला. त्यांचे 12 जून 2000 रोजी निधन झाले. महाराष्ट्राला अनेक माणिक मोती लाभले आहेत. त्यापैकी हे तीन. माणिक सरीतुन निखळले असल्याने मराठी संस्कृतीची खुप भरुन न निघणारी हानी झाली आहे. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आयोजक राजेश जाधव यांनी केले तर पाहुण्याचा परिचय महेश जोशी करून दिला.