शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
2
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
3
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
4
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
5
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
7
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
8
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
9
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
10
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
11
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
12
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
13
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
14
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
15
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
16
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
17
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
18
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
20
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 

गडकरी रंगायतनमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला राष्ट्रीय मतदार दिनी; कलाकारांनी घेतली मतदानाची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 8:24 PM

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय निवडणूक विभागातर्फेआयोजित या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ठाणे जिल्ह्यात तीन लाख ५४ हजार नवीन मतदारांची नावे नोंदविण्यात येऊन राज्यात प्रथम असल्याचे सांगितले. युवा मतदारांना मतदानाच्या कर्तव्याचा संदेश देण्यासाठी आलेल्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील राधिकेची भूमिका करणारी अनिता दाते म्हणाल्या की, आता ‘आपला वाँर्ड, आपला माणूस’ या चक्र ाभोवती न अडकता एक जबाबदार उद्याचा नागरिक म्हणून योग्य उमेदवाराला मतदान करा

ठळक मुद्दे ठाणे जिल्ह्यात तीन लाख ५४ हजार नवीन मतदारांची नावेजर मतदान करणार नसाल तर तुम्हाला व्यवस्थेवर बोलण्याचा काही हक्क नाहीजिल्हाधिकार्यांनी उपस्थितांना मतदान करण्याची शपथ दिली.

ठाणे : येथील गडकरी रंगायतनमध्ये झालेल्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला. यावेळी ठाण्यातील नवमतदारांनी उत्साहाने मतदान करण्याची शपथ घेतली, एवढेच नव्हे तर प्रमुख पाहुणे म्हणून आलेले मराठी चित्रपट, मालिका कलाकारांनी देखील आपल्यावरील मतदानाविषयी निरूत्साही असण्याचा शिक्का पुसून काढत मतदान यादीत नाव नोंदविल्याचा तसेच मतदान करण्याचा यावेळी निर्धार व्यक्त केला.ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय निवडणूक विभागातर्फेआयोजित या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ठाणे जिल्ह्यात तीन लाख ५४ हजार नवीन मतदारांची नावे नोंदविण्यात येऊन राज्यात प्रथम असल्याचे सांगितले. युवा मतदारांना मतदानाच्या कर्तव्याचा संदेश देण्यासाठी आलेल्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील राधिकेची भूमिका करणारी अनिता दाते म्हणाल्या की, आता ‘आपला वाँर्ड, आपला माणूस’ या चक्र ाभोवती न अडकता एक जबाबदार उद्याचा नागरिक म्हणून योग्य उमेदवाराला मतदान करा. मी नाव नोंदवून देखील ते मतदार यादीत आले नव्हेत किंवा कसे गायब झाले कळले नव्हते, पण तरीही मी त्याचा पाठपुरावा करून आपले नाव पुढील वेळेस कसे मतदान यादीत येईल हे पाहिले.श्वास, डोंबिवली फास्ट सारख्या चित्रपटातून आपल्या समर्थ अभिनयाची प्रचिती दिलेले संदीप कुलकर्णी यांनी सांगितले की, तुम्ही जर मतदान करणार नसाल तर तुम्हाला व्यवस्थेवर बोलण्याचा काही हक्क नाही, त्यामुळे हे कर्तव्य तुम्ही बजावलेच पाहिजे. ज्या व्यक्ती मतदानाचा अधिकार बजावत नाही, त्याना प्रस्थापित सरकारच्या विरोधात बोलण्याचा अजिबात हक्क नाही किंबहुना मतदान न केल्यामुळे तुम्ही तो गमावता असे ते म्हणाले. यावेळी कलाकारांना निवडणूक विभागातर्फे व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यिक्षक दाखिवण्यात आले.युवा मतदारांनी मतदान प्रक्रि येत अधिकाधिक सहभागी होण्यासाठी निबंध, वक्तृत्व , रांगोळी अशा विविध स्पर्धेच्या माध्यमातून जनजागती केली होती. या स्पर्धेतील विजेत्यांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी बांदोडकर महाविद्यालयाच्या मुलांनी पथनाट्य सादर केले. तर शहरातील प्रत्येक विधानसभा मतदार संघातील नवोदित मतदार, दिव्यांग मतदार यांना प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आले. मतदार नोंदणीत उल्लेखनीय काम करणाºया अधिकारी व कर्मचारी यांनाही यावेळी गौरविले. यावेळी जिल्हाधिकार्यांनी उपस्थितांना मतदान करण्याची शपथ दिली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल पवार, उप जिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी आरोलकर, उपजिल्हाधिकारी जलिसंग वळवी, उपेंद्र तामोरे, तहसीलदार सर्जेराव म्हस्के पाटील, अधिक पाटील, विकास पाटील, राज तवटे उपस्थित होते.* ‘तुम्ही आता बच्चा नाही आहात’ - शनाया- मराठी मालिकेतील ‘गुरु ’ उर्फ अभिजित खांडकेकर याने सांगितले की हा उत्साह बघून महाविद्यालयीन दिवस आठवतात. मी देखील आवर्जून मतदार करणार आहे आणि तुम्ही सुद्धा मतदान केलेच पाहिजे, बानो आणि शनायाच्या भूमिका केलेल्या इशा केसकर हिने देखील तुम्ही आता बच्चा नसून सुजाण नागरिक आहात. ज्यावेळी तुम्ही मतदानाचा अधिकार राबवाल त्याचवेळी एखाद्या सरकारी यंत्रणेविरोधात आवाज उठवण्याचा हक्क आहे, अन्यथा नाही. आपण मतदान करणार असून कितीही व्यस्त असलो तरी हे कर्तव्य बजावणारच आहे असेही तिने सांगितले.*सर्वाधिक नोंदणी कल्याण ग्रामीण, मुरबाडमध्ये- यंदाच्या मतदार दिनाचे घोषवाक्य ‘ नो व्होटर्स, टू बी लेफ्ट बिहार्इंड’ असे असून जास्तीत जास्त मतदारांनी नोंदणी करून मतदान करावे असा उद्देश आहे ,असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यात तीन लाख ९२ हजार नवीन मतदारांची नावे नोंदविण्यात आली आहेत. सर्वाधिक ४० हजार २२९ कल्याण ग्रामीण मध्ये, तर मुरबाडमध्ये ३७ हजार १६७ नावे नोंदविण्यात आली. ऐरोली २० हजार १६२, मुंब्रा कळवा १८ हजार ५९७, मीरा भार्इंदर २२ हजार ७१४ , भिवंडी ग्रामीण १८ हजार ६९५, शहापूर १३ हजार २०१, भिवंडी पश्चिम १९ हजार ४११, भिवंडी पूर्व १४ हजार ९५०, कल्याण पश्चिम ३३ हजार ९६७, अंबरनाथ १७ हजार १३२, उल्हासनगर १० हजार१३०, कल्याण पूर्व १७ हजार १९९, डोंबिवली १० हजार ७०३, ओवळा माजिवडा २१ हजार ३०३, कोपरी ७ हजार ७६३ अशी १८ विधानसभा मतदारसंघातील नवीन मतदार नोंदणीची आकडेवारी आहे.