शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

प्रवाशांच्या जीवाशी मांडला खेळ

By admin | Published: April 21, 2016 2:10 AM

मुरबे ग्रामपंचायतीने या वर्षी आपल्याला प्रवासी वाहतुकीचा ठेका १ एप्रिलपासून मिळणार हे माहित असूनही आवश्यकत्या कागदपत्रांची पूर्तता न केल्याने मुरबे, सातपाटी खाडीतून जीवघेणा

हितेन नाईक,  पालघरपालघर : मुरबे ग्रामपंचायतीने या वर्षी आपल्याला प्रवासी वाहतुकीचा ठेका १ एप्रिलपासून मिळणार हे माहित असूनही आवश्यकत्या कागदपत्रांची पूर्तता न केल्याने मुरबे, सातपाटी खाडीतून जीवघेणा प्रवास करण्याची पाळी प्रवाशांवर ओढावली आहे. अलिकडच्या काळात वऱ्हाड नेणारी बोट उलटून दोघांचा मृत्यू व अनेक जखमी होण्याची दुर्घटना घडली तरी प्रवाशांच्या जीवाशी खेळणारी ही वाहतूक सुरू आहे. गेल्याच आठवड्यात अशी होडी उलटून एकाचा मृत्यू होऊन सहा मरता मरता वाचले होते. तरी प्रशासन ढिम्म आहे.याबाबत वृत्त असे की, सातपाटी आणि मुरबे या दरम्यान खाडी आहे. ती ओलांडण्यासाठी बोट हे एकमेव साधन आहे. खाडीतून प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटीला मेरीटाइम बोर्डाची मान्यता घेणे, तिची प्रवास क्षमता, तांडेल, तिच्यावरील जीवरक्षक सुविधा याची तपासणी करून मग ती प्रवासाला सिद्ध करणे, याबाबी पार पाडल्या जात नाहीत. त्या ऐवजी एका वर्षी मुरबे आणि एका वर्षी सातपाटी येथील व्यावसायिकांना या बोटीने वाहतूक करण्याचा ठेका दिला जातो. २० प्रवासी क्षमतेची बोट दोन्ही व्यावसायिक वापरतात. प्रसंगी त्यातच ३० ते ४० प्रवासी भरले जातात. या वेळी १ एप्रिलपासून मुरबे येथील व्यावसायिकाला हा वाहतूक ठेका मिळणार होता. त्याने आपल्या बोटीबाबत आवश्यकत्या परवानग्या घेऊन त्याची कागदपत्रे सादर न केल्याने शेवटी छोट्या छोट्या होड्यांमधून जीवघेणी वाहतूक सध्या सुरू आहे. मुळात या होड्या प्रवासी वाहतूकीसाठी नसतात. त्यांची वहनक्षमता कमी असते तरीही पर्यायर नसल्यामुळे शेवटी ग्रामस्थ त्यांचा वापर करतात. सगळ््याना घाई असते मग जीवावरचा धोका पत्करून जास्तीतजास्त प्रवासी कोंबले जातात. त्यातूनच दुर्घटना होते. हे माहित असूनही प्रवाशांची जीवाशी खेळणारी ही वाहतूक सध्या सुरू आहे. त्यावर प्रशासन कोणती कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.मेरीटाइम बोर्डा सह इतर कायदेशीर परवानग्या न घेताच सालाबाद प्रमाणे या वर्षीही मुरबे-सातपाटी खाडीतील प्रवासी होडीचा ठेका सुरु करण्याचा मुरबे ग्रामपंचयतीचा हलगार्जी पणामुळे १६ दिवसा पासून प्रवासी होडी बंद पडली होती. त्या मुळे नाइलाजने एका छोट्या होडीतून प्रवास करताना गेल्या आठवड्यात झालेल्या अपघातात सातपाटी मधील दीपक मेर हया घरातील एकुलत्या एक कमावत्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू होवून ६ लोक मृत्यूशी झुंज देवून वाचले होते.सातपाटी-मुरबे खाडीतून प्रवास करणार्या प्रवाशांची वाहतूक करण्या साठी १ एप्रिल ते ३१ मार्च दरम्यान चा एक-एक वर्षाचा ठेका सातपाटी आणि मुरबे ग्रामपंचायतिला पंचायत समिति मार्फत दिला जातो. या प्रवासी वाहतुकीचा ठेका घेतांना महाराष्ट्र मेरीटाईम,बन्दर विभागा सह तत्सम विभागाच्या रितसर परवानग्या घेणे बंधनकारक असताना आता पर्यन्त अशा रितसर परवानग्या न घेताच बेकायदेशीररित्या प्रवासी वाहतूक केली जात होती. तसेच बोटीत क्षमते पेक्षा जास्त प्रवासी भरले जात असल्याने अपघाता ची शक्यता गृहीत धरून होडीत लाईम जॅकेट ठेवण्या संदर्भात प्रशासनाने आदेश द्यावेत या साठी लोकमत मागील आठ वर्षा पासून सतत वृत प्रसिद्ध करीत आहे. परंतु प्रशासनाला अद्यापही याचे गांर्भीय वाटत नसल्यामुळे एका कुटुंबातील कर्त्या पुरुषावर आपला जीव गमाविण्याची पाळी ओढवली आहे. विशेष म्हणजे ही बेकायदेशीर वाहतूक बंदर विभाग आणि कस्टम विभाग यांच्या कार्यालयासमोरुनच होत असते हे विशेष. तहसीलदार, गटविकास अधिकारी इ.नी चांगल्या, प्रशस्त बोटीची व्यवस्था करून द्यावी तिच्यात लाईफ जॅकटची सोय आहे की नाही याची तपासणी करावी. ती वरचेवर करण्याचे आदेश ग्रामसेवक आणि सरपंचाना द्यावेत अशी जनतेची मागणी आहे. सातपाटी-मुरबे ही दोन्ही मच्छीमारी गावे असल्याने मासेमारी व्यवसाय, मासे विक्र ी च्या दृष्टीने अथवा सहकारी संस्थांच्या आर्थिक व्यवहरांच्या दृष्टीने मुरब्यातील अनेक मच्छीमाराना खाडीतून येजा करावी लागते. तसेच मुरबे येथील टेक्नीकल कॉलेज, तारापूर एमआयडीसी मधील कारखान्यात काम करण्या साठी दररोज हजारो लोक,कामगार हया खाडीतून चालनाऱ्या बोटीतून प्रवास करतात. सातपाटी येथून पालघर,बोईसर असा प्रवास करून तारापूर च्या औद्योगिक परिसरातील कारखान्यात पोहचण्या साठी ५० ते ६० रु पये खर्च येतो.परंतु खाडीतून प्रवासी बोटीद्वारे १५ ते २० रूपयात सहज पोचता येते.यात वेळेचीही बचत मोठ्या प्रमाणात होतअसल्याने कामगार व विद्यार्थी खाडी तील प्रवासाला पसंती देतात.