शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
7
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
8
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
9
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
10
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
11
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
12
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
13
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
14
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
15
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
16
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
17
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
18
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
19
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
20
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

गण्या जाधव जेरबंद; पोलिसांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 2:44 AM

एरव्ही, एखाद्या गुंडाला अटक केल्यानंतर पोलिसांवर राजकीय दबाव यायला लागतो. परंतु, वर्तकनगरच्या रेकॉर्डवरील ‘टॉप २०’मधील कुख्यात गुंड गणेश सुधाकर जाधव ऊर्फ काळा गण्या (२०, रा. लोकमान्यनगर, ठाणे) याला जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : एरव्ही, एखाद्या गुंडाला अटक केल्यानंतर पोलिसांवर राजकीय दबाव यायला लागतो. परंतु, वर्तकनगरच्या रेकॉर्डवरील ‘टॉप २०’मधील कुख्यात गुंड गणेश सुधाकर जाधव ऊर्फ काळा गण्या (२०, रा. लोकमान्यनगर, ठाणे) याला जेरबंद केल्यानंतर राष्टÑवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे, दिगंबर ठाकूर, राधाबाई जाधवर आणि वनिता घोगरे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी पोलीस अधिकाºयांचा सत्कार केला.यापूर्वीही महाराष्टÑ विघातक कारवाया प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत कारवाई झालेल्या गण्यावर खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी उकळणे, अपहरण, दरोडा आणि मारहाण करणे, असे २३ गंभीर गुन्हे वर्तकनगर, नौपाडा आदी पोलीस ठाण्यांत दाखल आहेत. दहशतीमुळे त्यांची तक्रार करण्यासाठी कोणी पुढे धजावत नव्हते. चाकूच्या धाकावर एका रिक्षाचालकाचे दोन साथीदारांच्या मदतीने अपहरण करून त्याच्याकडून दीड हजाराची खंडणीही उकळली होती. या आणि अशा अनेक गुन्हेगारी कारवायांमुळे त्याला पकडण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांनी विशेष पथक तयार केले होते. सहायक पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, हवालदार भूषण गावंड, माणिक आहेर आणि पोलीस नाईक हेमंत मोरे आदींच्या पथकाने सापळा रचून सिनेस्टाइल पाठलाग करून २९ जुलै रोजी त्याला पकडले. या कारवाईचे लोकमान्यनगरातील रहिवाशांनी जोरदार स्वागत केले असून जगदाळे यांच्यासह २० ते २५ रहिवाशांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात जाऊन विभागाचे सहायक पोलीस आयुक्त महादेव भोर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरधर यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार केला. गण्याच्या माध्यमातून लोकमान्यनगर भागात महिला आणि तरुणांमधील गुंड टोळीची दहशत या कारवाईमुळे संपुष्टात आल्याचे जगदाळे म्हणाले.