टिटवाळा : स्वस्तात घर देण्याचे प्रलोभन दाखवत एका बिल्डरने बीएसएफ जवानासह त्याच्या भावाची फसवणूक केल्याचा प्रकार टिटवाळ्याजवळील गुरवली येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी तक्रारीवरून बिल्डर विमलेश तिवारी याला कल्याण तालुका-टिटवाळा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. दरम्यान, १० आॅगस्टला बिल्डरला अटक केली. नंतर १३ पर्यंत पोलीस कोठडी होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयात हजर केले असता आता २७ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
तिवारी याने गुरवली परिसरात इमारतीचे बांधकाम सुरू केले होते. स्वत:चे घर असावे, यासाठी बीएसएफ जवान रवी परिहार आणि त्यांचे भाऊ संतोष यांनी तिवारी यांच्या इमारतीत २१० आणि २११ नंबरच्या सदनिका बुक केल्या होत्या. तिवारी यांनी दोन्ही सदनिकांचे रजिस्ट्रेशन करत दोघांच्याही नावाने २०१७ मध्ये बँकेतून कर्जाची उचल केली. मात्र, तीन वर्षांपासून कर्जाचे हप्ते भरणाऱ्या परिहार बंधूंना अद्याप घराचा ताबा मिळालेला नाही.
दरम्यान, ज्या इमारतीत त्यांनी घर बुक केले होते, त्या इमारतीत दुसºया मजल्यावर चार सदनिका आहेत. या सदनिकांना अनुक्र मे २०१, २१०, २११ आणि अन्य एक असे क्र मांक आहेत. त्यापैकी २१० आणि २११ या सदनिका परिहार यांना विकल्या आहेत. मात्र, बँकेने यावर हरकत घेतली असून या इमारतीत २१० आणि २११ नंबरच्या सदनिका नसल्याचे सांगितले. त्यामुळे परिहार यांना धक्काच बसला आहे.परिहार यांनी दोन वर्षांपासून तिवारी यांच्याकडे रजिस्ट्रेशन दुरु स्त करून घराचा ताबा देण्यासाठी तगादा लावला. मात्र, तिवारीने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली.ग्रामीण भागात बेकायदा बांधकामेअखेर, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी याप्रकरणी बिल्डर तिवारी याच्याविरोधात कल्याण तालुका टिटवाळा पोलिसात तक्र ार दिली. या तक्र ारीनुसार, पोलिसांनी तिवारीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. टिटवाळा आणि ग्रामीण भागात बेकायदा बांधकामांचा, चाळींचा सुळसुळाट झाला आहे. मात्र] एकाही सरकारी यंत्रणांचे यावर नियंत्रण नसल्याने ग्राहकांची फसवणूक होत आहे. प्रशासनाने तातडीने दोषींवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.