डोंबिवली : डोंबिवलीचे ग्रामदैवत, सांस्कृतिक घडामोडींचे केंद्र असलेल्या गणेश मंदिर संस्थानची निवडणूक रविवारी, १७ सप्टेंबरला होणार असून नेहमीच्या त्याच चेह-यांना आव्हान देत बदल घडवण्यासाठी १० नवे चेहरे रिंगणात उतरले आहेत. त्यातही काही राजकीय उमेदवारांमुळे चुरस वाढली आहे.दहा जागांसाठी ही निवडणूक होत असून त्यासाठी १८ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात विद्यमान मंडळातील सात जण आहेत. ही संस्था १९२४ साली नोंदणीकृत झाली. तेव्हापासून दर तीन वर्षांनी निवडणुका होत. अशा २५ सदस्य मंडळांनी मंडळाचा कारभार हाकला आहे. पण २००३ पासून पंचवार्षिक निवडणुका सुरू झाल्या. तशी ती १७ सप्टेंबरला होणार आहे. अच्युत कºहाडकर, कुमार सप्तर्षी, प्रवीण दुधे, अलका मुतालिक, राहुल दामले, नीलेश सावंत, अरुण नाटेकर हे जुने आणि राजू कानिटकर, सुहास आंबेकर, शिरीष आपटे, गौरी कुंटे हे तुलनेने नवे सदस्य निवडणूक रिंगणात आहेत. ही निवडणूक ११ जागांसाठी होती. पण गौरी कुंटे बिनविरोध निवडून आल्या.निवडणुकीत वरील सदस्यांशिवाय संजय दामले, अनंत धोत्रे, संतोष काळे, प्रशांत कांत, लक्ष्मण वैद्य, सचिन कटके, विलास काळे आणि मंदार हळबे हे आठ उमेदवार प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आधीच्या सदस्य मंडळातील राहुल दामले हे राजकीय पार्श्वभूमी असलेले सदस्य होते. त्यांच्यापाठोपाठ मंदार हळबे रिंगणात उतरले आहेत. हळबे हे मनसेचे नगरसेवक असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत.पाच कोटींसाठी नव्हे, देवसेवेसाठी रिंगणातभक्तगणांच्या दानातून संस्थानला पाच कोटी रुपये मिळतात. त्यातून सामाजिक उपक्रम राबवले जातात. संस्थानने वर्षभरापूर्वीच पालिकेचे प्रल्हाद केशव अत्रे वाचनालय चालविण्यास घेतले. दृष्टिहीनांसाठी वेगळी सोय आणि बाल वाचन कक्ष सुरु आहे. सोनोग्राफी सेंटर चालविले जाते. २२ मंदिरामधील निर्माल्य गोळा करुन खत निर्मिती प्रकल्पाचा विस्तार केला जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या वाटिकेच्या सुसज्जीकरणावर १३ लाख खर्च झाले आहेत. संगणीकरणामुळे भक्ताने केलेल्या सेवेचा एसएमएस पाठवला जातो. डायलिसीस सेंटर उभे करुन किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्यांना दिलासा दिला जाणार आहे. ही निवडणूक पाच कोटींसाठी नव्हे, तर गणेशाच्या देवाच्या सेवेसाठी आहे. गणेश मंदिर संस्थानवर निवडून येणे हे प्रतिष्ठेचे लक्षण आहे, याकडे निवडणूक लढवणाºयांनी लक्ष वेधले.तीन दिवसांची रस्सीखेच : संस्थानचे चार हजार ८२२ सभासद असून सर्वांनाच मतदानाचा अधिकार आहे. त्यातील अडीच हजार सभासदच क्रियाशील असल्याने शेवटच्या तीन दिवसांत प्रचार करून निवडून येण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे.
गणेश मंदिर संस्थानच्या निवडणुकीसाठी रस्सीखेच , नव्या चेह-यांमुळे स्पर्धा, तरूण नेत्यामुळे वाढली चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 5:47 AM