शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
3
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
4
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
5
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
6
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
7
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
8
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
9
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
10
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
11
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
12
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
13
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
14
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
15
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
16
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
17
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
18
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
19
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
20
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट

गणेशोत्सवातून जगण्याची ऊर्जा मिळते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 11:30 PM

माझा जन्म घाटकोपरचा, पण बालपण भांडुपमध्ये गेले. चौथी इयत्तेत असताना भांडुपला राहायला आलो.

संदीप सामंतमाझा जन्म घाटकोपरचा, पण बालपण भांडुपमध्ये गेले. चौथी इयत्तेत असताना भांडुपला राहायला आलो. समाजकार्याचे वेड लहानपणापासूनच होते. आईवडील आणि मामांकडून समाजकार्याचा वसा मिळाला. वडील प्रभाकर सामंत यांची आयुर्वेद औषधांची फॅक्टरी होती तसेच ते एका औषधांच्या कंपनीत कामालादेखील होते. कामावरून घरी आल्यावर परिसरातील गरजू लोकांच्या वैद्यकीय मदतीला ते धावून जात. आई सुहासिनी गृहिणी होती. तिचाही वडिलांच्या समाजकार्याला हातभार लागायचा. आमच्या सुर्वे निवास चाळीच्या समोरच उत्कर्षनगर विकास मंडळाचा गणेशोत्सव साजरा व्हायचा. गणेशोत्सवासह होळी, महाशिवरात्र, गोकुळाष्टमी, शिवजयंती आदी उत्सव साजरे व्हायचे, पण गणेशोत्सव ११ दिवस साजरा होत असल्याने या सणाचे विशेष आकर्षण असायचे. मंडळाचे कबड्डी पथक होते, त्या पथकाचा मोठा नावलौकिक होता. मला आधीच सामाजिक कार्याची ओढ होती. पाचवीपासूनच मंडळाचे काम सुरू केले. त्यावेळी छोटा कार्यकर्ता म्हणून खारीचा वाटा उचलला. तेव्हा चलचित्रांना विशेष महत्त्व होते. कालांतराने १९९० साली डोंबिवलीत राहायला आलो. मुंबईत गणेशोत्सवाची धामधूम वेगळीच असायची. त्यामुळे डोंबिवलीत आल्यावर पहिल्या वर्षी गणपती कधी आले आणि कधी गेले, हे कळलेच नाही. हळूहळू मुंबईवरून कोकणातील बरीच मंडळी डोंबिवलीत वास्तव्याला आली आणि मुंबईच्या गणेशोत्सवाची झलक पाहायला मिळाली. डोंबिवलीत कार्यकर्ता म्हणून अचानक मित्र मंडळाच्या गणेशोत्सवापासून सुरुवात झाली. पश्चिमेतील हे एकमेव मंडळ ज्याठिकाणी गणपतीचे दर्शन खुले ठेवण्यात येते. त्यानंतर, भरत भोईरनगरमधील शिवराज मित्र मंडळात सक्रिय झालो. आज या मंडळाचे चोविसावे वर्ष आहे. तसेच शिवराज मित्र मंडळाने लहान मुले, तरुणांना व्यासपीठ मिळवून दिले. माघी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या श्री साईनाथ मित्र मंडळाचा कार्यकर्ता म्हणूनही कार्यरत आहे. ‘समाजाचे आपण काही देणे लागतो’ या उक्तीनुसार शैक्षणिक आणि आरोग्य शिबिरासारख्या कार्यक्रमांमधून सामाजिक कार्याचा वसा जपता येतो, हे देखील तितकेच खरे.(कार्यकर्ता, शिवराज गणेशोत्सव मित्र मंडळ, डोंबिवली)- शब्दांकन : प्रशांत मानेआपल्या रूढी, प्रथा, परंपरा सणांमधून जपल्या जातात. अनेकतेतून एकतेचे रूप सणांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि खूप नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. सण कुठलाही असो, त्याचे महत्त्व फार मोठे असते. दरवर्षी साजरा होणारा भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव असो अथवा माघी गणपतीचा उत्सव, याला जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या उत्सवातून कलागुणांना वाव मिळण्याबरोबरच वर्षभरातील ऊर्जा मिळत असते. वयाच्या नवव्या वर्षापासून मुंबई असो अथवा डोंबिवलीतील गणेश मंडळांच्या माध्यमातून जी नाळ जोडली, ती आज वयाची पन्नाशी उलटून गेली तरी कायम राहिली आहे.

टॅग्स :thaneठाणेGanesh Mandal 2019गणेश मंडळ 2019