शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
3
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
5
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
6
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची पोस्ट, म्हणाला- ED लागेल की बडतर्फी होईल?
7
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
8
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
9
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
10
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
11
लॅपटॉप आयातीत कपात? देशात उत्पादन वाढविणार!
12
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
13
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
14
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
15
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
16
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
17
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
18
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
19
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?

कोरोनामुळे गणेशोत्सव साधेपणाने; विसर्जनाच्या दिवशी यंदा ध्वनिप्रदूषणात ३० डेसिबलची घट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 11:57 PM

मिरवणुकांवरील बंधनामुळे टळला वाद्यांचा वापर

ठाणे : कोरोनामुळे नियमात अडकलेला गणेशोत्सव आणि त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवांची कमी झालेली संख्या, मिरवणुकांवर आलेली बंधने, यामुळे गौरीगणपती विसर्जनाच्या दिवशी ठाण्यातील ध्वनिप्रदूषणामध्ये ३० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. यावर्षी ध्वनिप्रदूषणाची पातळी ही ६० ते ७० डेसिबलच्या दरम्यान नोंदण्यात आली आहे. हेच प्रमाण गेल्या वर्षी ९० ते ९५ डेसिबलच्या दरम्यान होते. विशेष म्हणजे यावर्षी ध्वनिप्रदूषण करणाऱ्या वाद्यांचा वापर झालेला नाही.

कोरोनामुळे यंदा२०० पेक्षा अधिक मंडळांनी गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला. कोरोनामुळे ठाणे महापालिकेनेही मंडळांनातसेच घरगुती गणपती बसवणाऱ्यांना नियम आखून दिले. यामध्ये श्रीगणेशमूर्तीचे आगमन व विसर्जन मिरवणुकीच्या स्वरूपाचे नसावे, यावेळी के वळ तीन लोक असावेत. तसेच प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर करू नये. दर्शन, तीर्थप्रसाद व महाप्रसादासाठी गृहभेटी टाळाव्यात. घरीच श्रीगणेशाची आरती करून विसर्जन घाटावर गणपतीचे विसर्जन करावे, अशा सूचनांचा समावेश होता. मोठ्या गृहसंकुलांच्या ठिकाणी गणेशमूर्तीचे विसर्जन मोठ्या टाकीमध्ये करण्याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्याने यावर्षी विसर्जन मिरवणुकाही साध्या पद्धतीनेच निघाल्याने ध्वनिप्रदूषणात घट झाली.

गेल्या वर्षी विसर्जनाच्या दिवशी ढोलताशे, डीजे, बॅण्जो अशा वाद्यांचा वापर केल्याने ठाण्यातील महत्त्वाच्या निवडक ठिकाणी दक्ष नागरिक डॉ. महेश बेडेकर यांच्या माध्यमातून ध्वनिप्रदूषणाची पातळी मोजण्यात आली. यामध्ये सर्वच ठिकाणी ही पातळी ९५ डेसिबलपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले होते. यावर्षी मात्र ही पातळी ७० डेसिबलपेक्षा अधिक नसल्याची माहिती बेडेकर यांनी दिली.बाराबंगला परिसरात मात्र ध्वनिप्रदूषण : यंदा सर्वच ठिकाणी ध्वनिप्रदूषण कमी झाले असले तरी, शांतता क्षेत्रात मोडणाºया बाराबंगला परिसरात मात्र इतर परिसरांच्या तुलनेत जास्त ध्वनिप्रदूषणाची नोंद झाली आहे. इतर ठिकाणी ६५ ते ७० डेसिबल असताना कोपरी पूल, बाराबंगला येथे मात्र विसर्जनाच्या दिवशी ९० डेसिबलपर्यंत त्याची नोंद झाली आहे. या परिसरात छोट्या प्रमाणात मिरवणुका निघाल्या. तसेच फटाकेही वाजवण्यात आले होते.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव