शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! "उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला, जो शब्द..."; संभाजी ब्रिगेडनं युती तोडली
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत किती मराठा उमेदवार?
3
"उद्धव ठाकरेंनी नातं..."; अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देताच शिवसेना नेत्याने सोडलं मौन
4
'आम्ही युद्धाचे नाही, संवाद अन् मुत्सद्देगिरीचे समर्थक', BRICS मधून पीएम मोदींचा जगाला संदेश
5
आमदार विरुद्ध आमदार! कोरेगावात 'तुतारी' वाजणार की 'धनुष्यबाण' सुस्साट? दोन शिंदेंमध्ये लढत
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीमधील वाद मिटला, कोल्हेंनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली; फेसबुकवर केली भावनिक पोस्ट
7
जनतेच्या मनातला सामान्य आमदार मिळेल; उमेदवारी घोषित होताच महेश सावंत यांचा टोला
8
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात पोलिसांना आणखी एक आरोपी सापडला; आतापर्यंत ११ जणांना अटक
9
माहिमच्या हायप्रोफाइल लढतीत उद्धव ठाकरेंनी उतरवला शिवसैनिक, कोण आहेत महेश सावंत?
10
राज ठाकरेंच्या उमेदवारांना भाजप पाठिंबा देणार? बाळा नांदगावकरांचे महत्वाचे वक्तव्य
11
Mahayuti Seat Sharing: 106 जागांचा गुंता, कोणत्या विभागातील किती जागांची घोषणा बाकी?
12
मंत्रि‍पदासाठी फोन आला, १०० रुपये उसने घेऊन कपडे घेतले अन् शपथविधीला गेले; श्रीगोंद्यातील नेत्याचा किस्सा! 
13
अरे देवा! ७ मुलांची आई बॉयफ्रेंडसह पळून गेली, ढसाढसा रडत मुलांनी गाठलं पोलीस ठाणं, म्हणाले...
14
“१०५चा आकडा फेक, मविआत ४-५ जागांवर अजून मतभेद”: नाना पटोले; काँग्रेसची यादी कधी येणार?
15
उमेदवारी जाहीर होताच अमित ठाकरेंना सदा सरवणकरांनी डिवचलं; म्हणाले, "एक दिवस..."
16
प्रभासने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिले सरप्राइज, 'राजा साब'चा दमदार पोस्टर रिलीज
17
Jio Financial ची आणखी एक खेळी; 'या' कंपनीसोबत विकणार इन्शूरन्स पॉलिसी, चर्चा कुठवर?
18
बेंजामिन नेतन्याहू यांच्या बेडरूमपर्यंत पोहोचलं हिजबुल्लाहचं ड्रोन, पण...! इस्रायलचं टेन्शन वाढलं
19
दिवाळीत Cash मध्ये केवळ 'इतकं'च खरेदी करू शकता Gold; जास्त घेतल्यास द्यावी लागेल 'ही' माहिती
20
चोरी करण्यासाठी विमानाने जायचे; हायटेक गँगचा पोलिसांनी केला पर्दाफाश, ५ जणांना अटक

दंड न भरताच होणार गणेशोत्सव

By admin | Published: August 17, 2016 2:28 AM

ठाणे महापालिकेने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या शहरातील ४५० गणेशोत्सव मंडळांना पालिकेने एक लाखाच्या दंड भरण्याच्या नोटीसा बजावल्या होत्या.

ठाणे : ठाणे महापालिकेने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या शहरातील ४५० गणेशोत्सव मंडळांना पालिकेने एक लाखाच्या दंड भरण्याच्या नोटीसा बजावल्या होत्या. परंतु, या विरोधात राष्टवादीने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर अवघ्या काही दिवसात एक पाऊल मागे घेऊन पालिकेने त्या मागे घेतल्या आहेत. यामुळे आता दंड भरण्याचे विघ्न मंडळाच्या मानगुटीवरुन हटले असले तरी यापुढे जे नियमांची पायमल्ली करतील, त्यांच्यावर नियमानुसार दंड आकारला जाईल, असा इशारा मात्र दिला आहे. तसेच ज्या मंडळांना गणेशोत्सव साजरा करायचा असेल त्यांनी रितसर अर्ज करुन परवानगी घेऊनच मंडप उभारणीला सुरवात करावी असेही आवाहन पालिकेने केले आहे. परंतु, पालिकेची परवानगी घेण्याआधीच शहरातील अनेक भागात गणेशोत्सव मंडळांनी मंडप उभारणीला सुरवात केली आहे. विशेष म्हणजे काही नामांकीत मंडळांनी तर रस्त्यावर खड्डे खोदून मंडप उभारणीला सुरवात केल्याने पालिका आता या मंडळांच्या बाबतीत कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.ठामपाने शहरातील ४५० हुन अधिक मंडळांवर रस्त्यात गणेशोत्सव साजरा केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्याची सुरवात करुन दंडाची ही रक्कम न भरल्यास मंडळांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशा नोटीसाही बजावल्या होत्या. या संदर्भात राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेऊन दंड भरणार नसल्याचे सांगून वेळ पडल्यास रस्त्यावर गणेशोत्सव साजरा करु असा इशारा दिला होता. त्यानंतर अवघ्या चारच दिवसात पालिकेने आता या नोटीसा मागे घेण्यास सुरवात केली आहे. गणेशोत्सव काळात विना परवाना मंडप बांधणे, रस्त्यावर खड्डा खोदणे तसेच परवानगीतील अटी आणि शर्थींचा भंग करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना गेल्या वर्षी आकारण्यात आलेल्या दंडाची वसुली करण्यात येणार नसल्याचे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहे. परंतु, यावर्षी विना परवाना मंडप बांधणे, रस्त्यांवर खड्डे मारणे तसेच परवानगीतील अटी व शर्थींचा भंग केल्यास संबंधित मंडळांवर दंडात्मक कारवाई होईल.